खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

By Admin | Published: October 8, 2016 03:45 AM2016-10-08T03:45:06+5:302016-10-08T03:45:06+5:30

पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले.

Ability to change the world in sports: Nita Ambani | खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

googlenewsNext


व्हॅटिकन : खेळात जग बदलण्याची क्षमता आहे. मैदानावरील विजय आणि पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले.
नीता अंबानी यांनी स्पोर्टस् अ‍ॅट द सर्व्हिस आॅफ ह्युमॅनिटी या पहिल्या जागतीक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित होते. व्हॅटिकन सिटीत पार पडलेल्या या परिषदेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून नीता अंबानी यांनी हजेरी लावली. या परिषदेत अंबानी यांनी समाजावर खेळांचा होणारा परिणाम यावर भाष्य केले. तसेच रिलायन्स फांउडेशनकडून युवकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती देखील सगळ््यांना दिली. अंबानी म्हणाल्या की, ‘‘या परिषदेत क्रीडा क्षेत्रात आलेले अनुभव सांगताना आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात काम करताना असे लक्षात आले आहे की, खेळात माणसांना भौगोलिक क्षेत्र,धर्म, वंश यांच्या भिंती पाडून एकत्र आणण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)
सर्वात जादुई गोष्ट म्हणजे विजय किंवा पराभवानंतर येणारे हास्य आणि वाढणारी मैत्री ही आहे.’’नीता अंबानी या भारतात खेळांना रिलायन्स फांऊडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतात.

Web Title: Ability to change the world in sports: Nita Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.