डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंटसचा सनरायझर्स हैदराबादवर विजय

By admin | Published: April 27, 2016 12:24 AM2016-04-27T00:24:36+5:302016-04-27T00:24:36+5:30

डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंटसचा सनरायझर्स हैदराबादवर विजय

According to the Duckworth-Lewis rule, Raising Pune SuperJaytas beat Sunrisers Hyderabad | डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंटसचा सनरायझर्स हैदराबादवर विजय

डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंटसचा सनरायझर्स हैदराबादवर विजय

Next

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 27- डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंटनं सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी विजय मिळवला आहे.  रायझिंग पुणे सुपरजाएंट्सनं 11 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा केल्या आहेत. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार रायझिंग पुणे सुपरजाएंट संघाला विजयी घोषित करण्यात आलं आहे. यावेळी ड्यु प्लेसिसनं 21 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 3 चौकार ओढत 30 धावा केल्या आहेत. तर स्मिथनं नाबाद खेळत 36 चेंडूंत 7 चौकारांसह 46 धावा काढल्या आहेत. रहाणे 0, धोनी 5 धावा काढल्या आहेत. सलग तीन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघ पुणे सुपरजायन्ट्सविरुद्धच्या लढतीत संघर्ष करताना दिसला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्या धावा ११८ केल्या. पुणे सुपरजायन्टस संघाला विजयासाठी ११९ धावांची गरज. पुणे संघाच्या गोलंदाजांनी सुरवातीपासूनच सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पुणे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. मार्श आणि डिंडाने टिचून गोलंदाजी केली. १० षटकात सनरायझर्स हैदराबादच्या एकाही फलंदाजाला समाधानकारक फलंदाजी करता आली नाही. १० षटकात अर्धशतक फलकावर लागले नसताना त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. हैद्राबादकडून शिखर धवनने लौकिकास साजेशी खेळी करताना एकतर्फी झूंज दिली. त्याने शेटच्या ३ षटकात तुफानी फलंदाजी करताना संघाची धावसंख्या १००च्या पार केली. शिखरने ५३ चेंडूचा सामना करताना २ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादचे दिग्गज फलंदाज वार्नर, तरे, मॉर्गन, हूड्डा, हेनरिक्स यांना दुहेरी धावसंख्याही उभारता आली नाही. नमन ओझाने १८ धावांचे योगदान दिले. भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनने शेवटच्या हाणामारीच्या षटकात ९ चेंडूत २३ धावा जमवल्या. भुवनेश्व कुमारने ८ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. पुण्याकडून अशोक डिंडा सर्वात यशस्वी गोंलदाज ठरला त्याने ३ फलंदाजांना बाद केले. तर मार्शने २ फलंदांना तंबूत पाठवले. 

Web Title: According to the Duckworth-Lewis rule, Raising Pune SuperJaytas beat Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.