ऑसी जोड
By Admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:10+5:302015-02-14T23:52:10+5:30
फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्या बेलीने अर्धशतकी खेळीत ३ चौकार ठोकले.
फ ंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्या बेलीने अर्धशतकी खेळीत ३ चौकार ठोकले. यापूर्वी तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानणार्या इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिनने ७१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर स्टुअर्ट ब्रॉडने २ बळी घेतले. फिनने अखेरच्या षटकातील अखेरच्या ३ चेंडूंवर ब्रॅड हॅडिन (३१), ग्लेन मॅक्सवेल (६६) आणि मिशेल जॉन्सन (०) यांना तंबूचा मार्ग दाखविला. फिंचला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर ख्रिस व्होक्सने जीवदान दिले, त्या वेळी त्याने खातेही उघडले नव्हते. ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर (२२) आणि शेन वॉटसन (०) यांना एकापाठोपाठ माघारी परतवून इंग्लंडला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. पण, त्यानंतर बेली व फिंच यांनी चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. फिंच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. फिंच मॉर्गनच्या अचूक फेकीवर बाद झाला. त्यानंतर बेली फिनच्या गोलंदाजीवर बाद झाला. इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मोईन अली (१०) व गॅरी बॅलन्स (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर इयान बेल (३६) व जो रुट (५) यांना मार्शने १४व्या षटकात एकापाठोपाठ माघारी परतवून ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. इयोन मॉर्गनचा अडसर मार्शने दूर केला. धावफलकावर ७३ धावांची नोंद असताना इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. टेलर व व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. व्होक्स (३७ धावा, ४२ चेंडू) बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना विशेष छाप पाडता आली नाही. टेलरने ९० चेंडूंमध्ये नाबाद ९८ धावांची खेळी केली. त्यात ११ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)०००