अक्रम जोड
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:08+5:302015-02-21T00:50:08+5:30
विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे.
Next
व ंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे. भारतीय संघाचा विचार करता आठवड्याअखेर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अनेक जाणकार दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचा दावेदार मानत आहे; पण माझ्या मते ही लढत चुरशीची होईल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारतीय संघाला योजनाबद्ध फलंदाजी करावी लागेल. सलामीवीरांवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी राहणार आहे. १० षटकांत त्यांनी गडी न गमावता ४० धावाही फटकावल्या तरी ती वाईट कामगिरी ठरणार नाही. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर धोनी व रैना यांना अखेर आक्रमक खेळी करण्याची संधी राहील. सलामीवीरांना कसोटीप्रमाणे सावध फलंदाजी करावी लागेल. भारतीय संघाला काही अडचण भासत असेल तर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची लढत बघावी. झिम्बाब्वेने त्या लढतीत सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवले होते. ही लढत सर्वंच संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. दक्षिण आफ्रिका संघ बलाढ्य आहे; पण अपराजित नाही, हे झिम्बाब्वे संघाने सिद्ध केले आहे. (टीसीएम)