महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेची नवीन कार्यकारिणी , आदिल सुमारीवाला यांच्याकडे धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:06 AM2018-03-01T01:06:17+5:302018-03-01T01:06:17+5:30
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील नवाडे, पी. जे. म्हात्रे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या निवडणुकीत २०१६-२० वर्षांसाठीची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. खजिनदारपदी सोलापूरचे राजू प्याटी यांची निवड झाली. पुण्यात गेल्या वर्षी तीन डिसेंबरला झालेली बैठकच या वेळी पुढे सुरू करण्यात आली. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी, महासंघातर्फे कोषाध्यक्ष पी. के. श्रीवास्तव, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेचे नामदेव शिरगावकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
कार्यकारिणी (२०१६-२०) पुढीलप्रमाणे : -
आजीवन अध्यक्ष : सुरेश कलमाडी, अध्यक्ष : आदिल सुमारीवाला, चेअरमन : अॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष : नारायण खडके, बालाराम पाटील, श्रीकांत जोशी, दिलीप जयस्वाल, गोपालसिंग राजपूत, संजय बडोले, रणजितसिंग राणे, ए. रिझवी. सरचिटणीस : सतीश उचिल.
सहसचिव : संजय पाटील, राजीव जोशी, माधव शेजूळ, प्रलोभ कुलकर्णी, हेमंत पांडे, अतुल पाटील, ललित जिवानी, खजिनदार : राजू प्याटी, सदस्य : सुरषा फरकाटे, अशोक अहेर, रमेश गंगावणे, विक्रम संख्ये, राजेश जाधव, अनिल बोंडे, शरद सूर्यवंशी, संजय वाटेगावकर, एएफआय प्रतिनिधी : अध्यक्ष व सरचिटणीस.