आदित्यची विजयी घोडदौड

By admin | Published: January 4, 2015 01:23 AM2015-01-04T01:23:23+5:302015-01-04T01:23:23+5:30

रेल्वेच्या आदित्य अग्रवालने ‘फ’ गटातून खेळताना सलग दोन सामन्यांत बाजी मारत माटुंगा जिमखाना ओपन बिलियडर््स स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली.

Aditya's winning streak | आदित्यची विजयी घोडदौड

आदित्यची विजयी घोडदौड

Next

मुंबई : रेल्वेच्या आदित्य अग्रवालने ‘फ’ गटातून खेळताना सलग दोन सामन्यांत बाजी मारत माटुंगा जिमखाना ओपन बिलियडर््स स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली. दुसऱ्या बाजूला जागतिक सांघिक सुवर्ण विजेत्या अशोक शांदिलीया आणि जागतिक सांघिक रौप्य विजेत्या ध्रुव सितवाला यांनीदेखील आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना आगेकूच केली.
महाराष्ट्र बिलियडर््स आणि स्नूकर संघटनेच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्यने सलग दोन विजयांची नोंद करताना पहिल्या सामन्यात अनुभवी व कसलेल्या रॉनी दारूवाला (पीजे हिंदू जिम) ३-१ असे नमवले. यानंतर हाच धडाका कायम राखताना आदित्यने एलन्फिस्टन सीसीच्या सुनील जैनचा ३-०ने धुव्वा उडवला.
आदित्यने पहिल्या फ्रेममध्ये सहज बाजी मारल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रॉनीने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुनरागमन करताना सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर मात्र एकहाती वर्चस्व राखताना आदित्यने सलग दोन फ्रेममध्ये बाजी मारताना १००(५५)-४९, ८६-१००(४०), १००-६९, १००(५०)-१२ असा विजय मिळवला. यानंतरच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात आदित्यने सहज विजय मिळवताना सुनीलचा १००-३८, १००-४५, १००-८२ असा धुव्वा उडवला.
दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या कसलेल्या अशोक शांदिलीयाने आपला उच्च दर्जाचा खेळ सादर करताना ‘क’ गटामध्ये पार्क क्लबच्या विशाल गेहानीला १००-८७, १००(७६)-५, १००(९२)-३६ असे नमवले. तसेच ‘अ’ गटामध्ये पीजे हिंदू जिमखानाच्या बलाढ्य ध्रुव सितवालाने अपेक्षित निकाल लावताना चेंबूर जिमच्या निखिल लालवानीचा १००-२३, १००(९२)-१६, १००(९९)-० असा पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)

‘ब’ गट : विशाल मदन (चेंबूर जिम) वि.वि.जयवीर धिंग्रा (पीजे हिंदू जिम) ६७-१००, १००(५२)-१०, १००-५८, १००-८५; ललीत झाम (पार्क क्लब) वि.वि. अंकित ठक्कर (माटुंगा जिम) १००-८१, ६८-१००, १००-६१, १००(५५)-३०; जयवीर धिंग्रा वि.वि. ललीत झाम १००-४७, १००-४५, १००-८२.
‘क’ गट : रिषभ ठक्कर (खार जिम) वि.वि. विशाल गेहनी १००-५, १००-१८, १००-६४.
‘ई’ गट : शेखर सुर्वे (एसपीजी) वि.वि. सायरस (डीजीसीजी) ३३-१००, १००(४२)-३०, ९६-१००, १००-६३, १००-२०; सिद्धार्थ पारिख (सीसीआय) वि.वि. शेखर क्रिष्णन (चेंबूर जिम) १००-३०, १००(७३)-१३, १००(६२)-११.
‘ग’ गट : अरुण अगरवाल (माटुंगा जिम) वि.वि. शैलेश राव (माटुंगा जिम) १००(५९)-११, १००(४२)-३३, १००(७२)-१४.
‘ह’ गट : चंदू कंसोदरीया (एमसीएफ) वि.वि. जतिंदर दावर (एनएससीआय) १००-८७, १००-४३, ९५-१००, १००-९४.

Web Title: Aditya's winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.