अडवाणी १४ व्यांदा विश्वविजेता

By admin | Published: September 28, 2015 01:44 AM2015-09-28T01:44:36+5:302015-09-28T01:44:36+5:30

भारताचा सर्वाधिक यशस्वी बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना रविवारी १४ व्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

Advani 14 times world champion | अडवाणी १४ व्यांदा विश्वविजेता

अडवाणी १४ व्यांदा विश्वविजेता

Next

अ‍ॅडिलेड : भारताचा सर्वाधिक यशस्वी बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना रविवारी १४ व्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
येथे आटोपलेल्या आयबीएसएफ विश्व बिलियर्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ३० वर्षांच्या पंकजने फायनलमध्ये सिंगापूरचा पीटर गिलख्रिस्ट याच्यावर ११६८ गुणांनी मात केली. १४ व्या विश्वविजेतेपदाबद्दल पंकज म्हणाला,‘ गुणांवर आधारित लढत पीटरला गमविल्यानंतर पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार केला होता. मी मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या भावाचा सल्ला घेतला शिवाय रात्री छान झोप घेतली. फायनलच्या आदल्या रात्री केलेल्या या दोन गोष्टींमुळे मी येथे विश्वविजेता बनू शकलो. बेंगळुरूचा ‘ गोल्डन बॉय’ असलेल्या पंकजने जेतेपदासोबतच वेळेनुसार असलेल्या प्रकारातील जेतेपद कायम राखले. गिलख्रिस्टकडून पंकज आठवडाभरापूर्वी गुणांच्या प्रकारात पराभूत झाला होता.पंकजने सुरुवातीला १२७ गुण घेत आघाडी संपादन केली. नंतर गिलख्रिस्टच्या कमकुवतपणाचा लाभ घेत आणखी ३६० आणि ३०१ गुणांची कमाई करीत पाच तासांच्या या सामन्यातील पहिल्या तासात पंकजने सामन्यावर पकड निर्माण केली होती. ७०० गुणांच्या आघाडीनंतरही पंकजने २८४, ११९, १०१ आणि १०६ अशी कमाई केल्याने मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११०० गुणांची आघाडी झाली होती.
उत्तरार्धातही अडवाणीने दोनदा आघाडी घेतली पण पीटरने काही गुण मिळवित पंकजची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर अडवाणीने पुन्हा ४३० गुणांची कमाई करीत पीटरचा पराभव निश्चित केला होता. ३०० मिनिटांच्या या सामन्यात अंतिम गुणफलक २४०८-१२४० असा होता. अडवाणीने जेतेपदासह वेळेच्या प्रकारात जेतेपदावर वर्चस्व कायम राखले आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये पंकज दोन्ही प्रकाराचा विश्व चॅम्पियन बनला.(वृत्तसंस्था)

Web Title: Advani 14 times world champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.