विराटसोबत फलंदाजी करण्याचा फायदा : केदार

By admin | Published: January 18, 2017 04:19 AM2017-01-18T04:19:09+5:302017-01-18T04:19:09+5:30

विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा मला वेगळ्या पद्धतीने फायदा झाला.

The advantage of batting with Virat: Kedar | विराटसोबत फलंदाजी करण्याचा फायदा : केदार

विराटसोबत फलंदाजी करण्याचा फायदा : केदार

Next


पुणे : विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा मला वेगळ्या पद्धतीने फायदा झाला. इंग्लिश गोलंदाजांनी त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. यामुळे मला फलंदाजी करणे सोपे झाले होते, अशी प्रतिक्रिया भारताच्या पहिल्या वन-डे विजयाचा हिरो केदार जाधवने दिली.
भारत-इंग्लंड मालिकेतील पुण्यात झालेल्या पहिल्या लढतीत ‘लोकल बॉय’ केदारने आक्रमक शतक झळकावत भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिले. मंगळवारी यासदर्भांत पत्रकारांशी संवाद साधताना केदार म्हणाला, ‘‘विराटसोबत फलंदाजी करताना दुसऱ्या फलंदाजाला कायम फायदा होत असतो. कारण, गोलंदाजांसह सर्व प्रतिस्पर्धी संघ त्याला धावा करण्यापासून रोखण्यासाठी तसेच बाद करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असतात. यामुळे दुसऱ्या एंडवर फलंदाजांकडे प्रतिस्पर्ध्यांना फारसे लक्ष केंद्रित करता येत नाही. याचा फायदा म्हणजे गोलंदाज दुसऱ्या फलंदाजाला गंभीरपणे घेत नाहीत. त्याला कमजोर चेंडू खेळायला मिळतात. माझ्या बाबतीतही असेच घडले.’’ ३१ वर्षीय केदारने १२० धावांची ‘करिअर बेस्ट’ खेळ करणाऱ्या केदारने दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या खेळीत केदारने साहेबांची वेगवान आणि फिरकी गोलंदाजी फोडून काढत १२ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The advantage of batting with Virat: Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.