दडपणमुक्त फलंदाजीमुळे लाभ : युवी
By admin | Published: April 7, 2017 03:58 AM2017-04-07T03:58:14+5:302017-04-07T03:58:14+5:30
यंदा राष्ट्रीय वन डे संघात यशस्वी पुनरागमन झाल्यापासून मोकळ्या मनाने फलंदाजी करीत आहे
हैदराबाद : यंदा राष्ट्रीय वन डे संघात यशस्वी पुनरागमन झाल्यापासून मोकळ्या मनाने फलंदाजी करीत आहे. दडपणमुक्त फलंदाजीचा लाभ झाल्याचे मत अष्टपैलू युवराजसिंग याने व्यक्त केले.
युवीने इंग्लंडविरुद्ध वन डे संघात पुनरागमन केले होते. कटकच्या दुसऱ्या सामन्यात त्याने १५०, तर कोलकाता येथील तिसऱ्या वन डेत ४५ धावांची खेळी केली. डावखुऱ्या युवराजने काल आयपीएल-१० च्या सलामी लढतीत हैदराबादकडून बँगलोरविरुद्ध २७ चेंडंूत ६२ धावांचा झंझावात केला. सामन्यानंतर तो म्हणाला, ’मागच्या दोन वर्षांत फलंदाजीत चढउतार आला होता.’यंदा फॉर्ममध्ये परतलो. संघात परतल्यापासून मुक्तपणे फटकेबाजीचा आनंद लुटतो. कठोर मेहनत आणि समर्पितवृतीच्या बळावर संघात पुनरागमन शक्य झाले. त्यासाठी अनेक चेंडू टोलवित सराव केला. हैदराबाद माझ्यासाठी ‘लकी’ आहे. या मैदानावर धावा केल्यानंतर मी पुढेही चांगला खेळतो. यंदादेखील अधिक धावा काढू शकेन, अशी आशा आहे.’(वृत्तसंस्था)