पाकविरुद्धचे सामने अफगाणिस्तानने रद्द केले

By admin | Published: June 2, 2017 01:05 AM2017-06-02T01:05:01+5:302017-06-02T01:05:01+5:30

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेने पाकिस्तानसह आयोजित केलेली प्रस्तावित क्रिकेट मालिका

Afghanistan has canceled the match against Pakistan | पाकविरुद्धचे सामने अफगाणिस्तानने रद्द केले

पाकविरुद्धचे सामने अफगाणिस्तानने रद्द केले

Next

काबूल : अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेने पाकिस्तानसह आयोजित केलेली प्रस्तावित क्रिकेट मालिका रद्द केली आहे. अफगाणिस्तानच्या गुप्तहेर संस्थेने, आतंकवादी संघटनेमागे इस्लामाबादचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आणि यामुळे मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तान काबूलमध्ये आपला पहिला टी२० सामना खेळणार होता. त्याचप्रमाणे, काबूलमध्ये जुलै किंवा आॅगस्टमध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये एक सामना खेळविला जाणार होता,
तसेच एक संपुर्ण मालिकाही खेळविण्याची योजना होती. परंतु काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने (एसीबी) कठोर शब्दांत पत्रक जाहीर करताना सामने रद्द केल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)

पाकसोबत संबंध तोडले

दरम्यान, यानंतर एसीबीने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तान क्रिकेट बोर्डसोबतचे सर्व क्रिकेट सामने आणि परस्पर संबंध तोडत आहे.’
अफगाणिस्तानच्या या कठोर भूमिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मायदेशात पुनरुज्जीन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी, कोणत्याही आंतकवादी संघटनेने अद्याप काबूल येथील हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. तसेच, तालिबाननेही या स्फोटात आपला सहभाग असल्याचे फेटाळले आहे.

Web Title: Afghanistan has canceled the match against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.