आफ्रिकेच्या फुटबॉलपटूची गोळी घालून हत्या
By admin | Published: October 28, 2014 01:08 AM2014-10-28T01:08:12+5:302014-10-28T01:08:12+5:30
दक्षिण आफ्रिका फुटबॉल टीमचा कर्णधार आणि गोलकिपर सेंजो मेईवा यांची रविवारी रात्री जोहान्सबर्गजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली आह़े
Next
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका फुटबॉल टीमचा कर्णधार आणि गोलकिपर सेंजो मेईवा यांची रविवारी रात्री जोहान्सबर्गजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली आह़े चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर घरात घुसल्यानंतर ही घटना घडल्याची शक्यता आह़े वृत्तसंस्थेला सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिका फुटबॉल टीम व्यतिरिक्त ओरलेंडो पाईरेटस् या क्लबचे प्रतिनिधित्व करणारा मेईवा रविवारी रात्री जोहान्सबर्गजवळ वोस्लूरस येथे परिचित असलेल्या व्यक्तीच्या घरी गेला होता़ तेथेच चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले दोन हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांनी मेईवावर गोळी झाडली़
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तींनी मोबाईल फोनची मागणी केली होती़ मेईवा याने इन्कार केल्यानंतर त्याच्यावर गोळी घालण्यात आली़ यानंतर या फुटबॉलपटूला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल़े दरम्यान, पोलिसांनी संशयितांची माहिती देणा:यांना रोख बक्षीस जाहीर केले आह़े यापूर्वी 8क्क् मीटर स्पर्धेत माजी चॅम्पियन राहिलेला आफ्रिकेचा धावपटू मबुलाईनी मुलोदजी हा शुक्रवारी एका कार अपघातात ठार झाला होता, तसेच नुकतेच ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस याला आपल्या प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 5 वर्षाची कैद सुनावली आह़े
(वृत्तसंस्था)