पराभूत पाकिस्तानी संघाला आफ्रिदीकडून फटके

By admin | Published: June 5, 2017 04:35 PM2017-06-05T16:35:59+5:302017-06-05T16:35:59+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानी संघाची स्थानिक प्रसारमाध्यमे आणि माजी खेळाडूंकडून

Afridi defeated defeated Pakistan team | पराभूत पाकिस्तानी संघाला आफ्रिदीकडून फटके

पराभूत पाकिस्तानी संघाला आफ्रिदीकडून फटके

Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 -  चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानी संघाची स्थानिक प्रसारमाध्यमे आणि माजी खेळाडूंकडून धुलाई सुरू आहे. एकेकाळी विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही पाकिस्तानी खेळाडूंना शाब्दिक फटके दिले आहेत. गतविजेता भारतीय संघ या लढतीत विजेतेपदाच्या प्रबळ दावेदाराप्रमाणे खेळला. तर पाकिस्तानच्या संघाने केलेल्या सुमार खेळामुळे या सामन्यातील सगळी रंगतच निघून गेली, असे आफ्रिदी म्हणाला.
 
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार 124 धावांनी मात केली होती. या लढतीत पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचे आफ्रिदीने आपल्या लेखातून वाभाडे काढले आहेत. आफ्रिदी आपल्या लेखात म्हणतो,  भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवल्या गेलेल्या लढतीत अपेक्षित असलेला रोमांच दिसलाच नाही. पाकिस्तानने केलेली अत्यंत निराशाजनक कामगिरी हे त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण. पाकिस्तानी संघाचा चाहता असल्याने माझ्यासाठी हा पराभव पाहणे दु:खद होते."
पण या लेखात आफ्रिदीने भारतीय संघाचे मात्र कौतुक केले आहे, "भारतीय संघाने या सामन्यात आपला दबदबा सिद्ध केला. भारतीय संघाने प्रबळ दावेदाराच्या थाटात खेळण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण सामन्यात तसाच खेळ केला. तर पाकिस्तानने मात्र बघता बघता शरणागती पत्करली."
 
(युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!)
 
 
 पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदच्या ढिसाळ रणनीतीचाही आफ्रिदीने समाचार घेतला. "नाणेफेकीचा कौल सर्फराझने जिंकला. पावसाळी वातावरणात नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असते कारण पाऊस आल्यास नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत असतो. पण या संधीचा पाकिस्तानी संघ फायदा उठवू शकला नाही. संघाची रणनीती खूप वाईट होती, त्यात क्षेत्ररक्षणही सुमार झाले." असे आफ्रिदी म्हणाला. 

Web Title: Afridi defeated defeated Pakistan team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.