आफ्रिदी होणार निवृत्त
By admin | Published: March 23, 2016 05:52 AM2016-03-23T05:52:08+5:302016-03-23T05:52:08+5:30
भारताविरुद्धचा पराभव आणि न्यूझीलंडनेही घरची वाट दाखवल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने अखेर निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २३ - पाकपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, अशा शब्दांत भारताबद्दलच्या भावना व्यक्त करणे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. भारताविरुद्धचा पराभव आणि न्यूझीलंडनेही घरची वाट दाखवल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने अखेर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणारा सामना हा आपल्या करिअरचा कदाचित अखेरचा सामना असेल, असे त्याने न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यानंतर सांगितले. आशिया चषकानंतर आता टी २० विश्वचषकातील पाकिस्ताचे आव्हान संपुष्टात आल्यासारखेच आहे. त्यामुले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या शक्यता आहे. विश्वचषकास सुरवात झाल्यापासूनच शाहिद आफ्रिदी वादाच्या भोलऱ्यात अडकला. पाकिस्तान पेक्षा भारतात मला जास्त प्रेम मिळते असे विधान करत पाकिस्तानी चाहत्याच्या टिकेचा धनी झाला. चाहत्याबरोबरच पाकिस्ताच्या माझी खेळाडूंनीही त्याच्यावर तोंडसुख घेतले.
जाता जाता आफ्रिदीने वादग्रस्त विधान केले आहे. भारत-पाक सामन्यादरम्यान पाकला समर्थन देण्यास काश्मीरमधून चाहते आल्याचे तो म्हणाला बोलताना म्हणाला. आता या विधानावरुन तो कोणाच्या टिकेचा धनी ठरतो हे लवकरच समजेल.
दरम्यान, अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याची सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात येईल, अशी घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सोमवारी केली. याशिवाय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील आफ्रिदीचे दिवस संपत आल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
भारताप्रति प्रेम जाहीर केल्यानंतर नाराजी झेलणारा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने मंगळवारी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, ‘‘माझा हेतू केवळ भारतात राहणाऱ्या माझ्या चाहत्यांचे आभार मानणे आणि एक सकारात्मक संदेश देणे, हाच होता.’’ असे स्पष्टीकरण आफ्रिदीने दिले आहे.