11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त

By Admin | Published: May 11, 2017 02:24 PM2017-05-11T14:24:42+5:302017-05-11T14:37:22+5:30

1 ते 18 जून या कालावधीत इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना प्रधान्या देण्यात आले आहे.

After 11 years the player will play "Champions Trophy" | 11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त

11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - 1 ते 18 जून या कालावधीत इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना प्रधान्या देण्यात आले आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग तब्बल 11 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत आहे. 2007 आणि 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या आयसीसी विश्वचषकात युवराज सिंगचे मोलाचे योगदान होते. गतविजेत्या भारतीय संघात युवराजची वर्णी लागली नव्हती. केनियात 2002 मध्ये झालेल्या स्पर्धेद्वारे पदार्पण करणाऱ्या युवीने 2006 पर्यंतच्या सर्वच स्पर्धेत भाग घेतला. 
2009 आणि 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत युवराज सिंगची निवड झालेली नव्हती. त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी युवराज साठी म्हत्वाची असणार आहे. आयसीसीच्या टी 20 आणि 50 षटकांच्या विश्वचषकात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युवराजच्या आंतराष्ट्रीय करियरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सोडचा आय़सीसीच्या सर्वच मोठ्या स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. आणि त्यात त्याचे मोलाचे योगदान आहे.
भारतीय संघात निवड झालेल्यानतंर माध्यमांशी बोलताना युवराजने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले मनसुबे स्पष्ट केले. युवराज म्हणाला, 50 षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल मी आनंदी आहे. जेतेपदाचा बचाव करता यावा, यासाठी संघाच्या विजयात योगदान देण्याची आपली तयारी असेल. अन्य कुठल्याही आयसीसी स्पर्धेसारखीच हीदेखील आव्हानात्मक स्पर्धा आहे. ओव्हलवर 18 जून रोजी अंतिम सामना खेळण्याच्या इराद्यानेच प्रत्येक संघ उतरणार, यात शंका नाही. मी 11 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार असल्याने योगदान देणे किती कठीण असते याची जाणीव आहे.
भारताला गटात पाकिस्तान, द. आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत स्थान मिळाले आहे. भारताने 2013 च्या विजेत्या संघातील आठ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यात विराट कोहलीसह रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. कोहली आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा भारताचे नेतृत्व करत आहे.

असा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ -  

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), युवराज सिंग, केदार जाधव, हार्दीक पंडया, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मनीष पांडे. 
 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

 

1 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

2 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

4 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)

5 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

6 जून - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)

7 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)

8 जून - भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)

9 जून - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)

10 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

11 जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

12 जून - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)

14 जून - सेमीफायनल १ (कार्डीफ)

16 जून - सेमीफायनल २ (एजबॅस्टन)

18 जून - फायनल मॅच (ओव्हल)

Web Title: After 11 years the player will play "Champions Trophy"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.