२९ साल बाद...

By admin | Published: November 4, 2016 04:10 AM2016-11-04T04:10:28+5:302016-11-04T04:10:28+5:30

भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार

After 29 years ... | २९ साल बाद...

२९ साल बाद...

Next


नवी दिल्ली : भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार आहे.
भारताने यापूर्वी १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २९ वर्षांनी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. इंग्लंड संघ बांगलादेशचा दौरा आटोपून भारतात डेरेदाखल झाला आहे.
भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान यापूर्वी इंग्लंडच्या यजमानपदाखाली २०१४ मध्ये मालिका खेळली होती. त्या वेळी इंग्लंडने ३-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघ यापूर्वी पाच मालिकेत अपराजित असून, या वेळी इंग्लंडविरुद्ध पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
भारताला २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात २-१, दक्षिण आफ्रिकेला २०१५-१६ मध्ये भारतात ३-० ने, वेस्ट इंडीजला २०१६ मध्ये २-० ने आणि अलीकडेच न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले आहे.
इंग्लंडने १९३३-३४ मध्ये भारताचा प्रथमच दौरा केला होता. त्या वेळी इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका
२-० ने जिंकली होती. भारत
प्रथमच पाच सामन्यांची मालिका १९४७-४८ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. भारतात १९४८-४९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने २० वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. या कालावधीत भारताने पाच अशा मालिकांचे आयोजन केलेले आहे की त्यात सहा-सहा कसोटी सामन्यांचा समावेश होता. गेल्या २९ वर्षांत भारताने दोन, तीन किंवा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे.
भारताने इंग्लंडविरुद्ध आपल्या यजमानपदाखाली खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील १९५१-५२ ची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविली, तर १९६१-६२ च्या मालिकेत २-० ने, तर ७२-७३ च्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला. भारताने १९७६-७७ ची मालिका १-३ ने गमावली, तर १९८१-८२ ची मालिका १-० ने जिंकली. भारताला १९८५-८६ च्या मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान आपल्या कसोटी इतिहासातील ९०० वा सामना पूर्ण करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध ११२ कसोटी सामन्यांत २१ विजय मिळविता आले, तर ४३ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४८ सामने अनिर्णीत संपले. (वृत्तसंस्था)
भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १९४८-४९ मध्ये
वेस्ट इंडीज, १९५१-५२ मध्ये इंग्लंड, १९५२-५३ मध्ये पाकिस्तान,
१९५५-५६ मध्ये न्यूझीलंड, १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडीज, १९५९-६० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९६०-६१ मध्ये पाकिस्तान, १९६१-६२ मध्ये इंग्लंड,
१९६३-६४ मध्ये इंग्लंड, १९६९-७० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९७२-७३ मध्ये इंग्लंड, १९७४-७५ मध्ये वेस्ट इंडीज आणि १९७६-७७ मध्ये इंग्लंड यांचे यजमानपद भूषविले आहे.
त्यानंतर भारताने १९७८-७९ वेस्ट इंडीज, १९७९-८० मध्ये आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान, १९८१-८२ मध्ये इंग्लंड व १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडीज या संघांविरुद्ध प्रत्येकी सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद
भूषविले आहे. भारताने १९८४-८५ मध्ये इंग्लंड आणि १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे.

Web Title: After 29 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.