३६ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By admin | Published: August 12, 2016 05:14 AM2016-08-12T05:14:57+5:302016-08-12T05:14:57+5:30
उप उपांत्यपूर्व फेरीतील जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने भारताने उपांत्यपूर्व फेरीतील धडक मारली आहे. १९८०नंतर प्रथमचं भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १२ : उप उपांत्यपूर्व फेरीतील जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने भारताने उपांत्यपूर्व फेरीतील धडक मारली आहे. १९८०नंतर प्रथमचं भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या आज झालेल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जाव लागलं. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले असले तरी चौथ्या लढतीत हॉलंडविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे ३२ वर्षांपूर्वी हॉलंडविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यात भारत अपयशीच ठरला.
भारताला अखेरच्या सेकंदाला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर भारताला गोल नोंदवता आला नाही. भारताला ह्यबह्ण गटातील चौथ्या साखळी सामन्यात १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे व्ही.आर. रघुनाथने ३८ व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. हॉलंडतर्फे रोजिर होफमॅनने ३२ व्या मिनिटाला आणि मिंक वान डेर वीरडनने ५४ व्या मिनिटाला गोल नोंदवले.
भारताने सलामी लढतीत आयर्लंडचा ३-२ आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा २-१ ने पराभव केला. भारताला जर्मनी व हॉलंड या संघांविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला भारताने विद्यमान युरोपियन चॅम्पियन हॉलंडविरुद्ध चांगला बचाव केला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. त्यानंतर वेगवान खेळ बघायला मिळाला. हॉलंडतर्फे रोजर होफमॅनने ३२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाचे खाते उघडले. लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरलेल्या हॉलंडला हा आनंद अधिक वेळ उपभोगता आला नाही.
३८ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. व्ही.आर. रघुनाथने गोल नोंदवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर उभय संघांनी गोलचा चांगला बचाव केला, पण अखेरच्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर देणे भारताला महागडे ठरले. मिंक वान डेर वीरडनने ५४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
भारतीय संघाने ह्यबह्ण गटात चार सामन्यात दोन विजयासह ६ गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. हॉलंडच्या खात्यावर एकूण १० गुणांची नोंद असून सहा संघांमध्ये हा संघ अव्वल स्थानी आहे.