तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 08:40 AM2019-09-14T08:40:06+5:302019-09-14T08:53:27+5:30
भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते.
नवी दिल्ली: भारत- पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. तसेच भारत आणि पाकिस्तानची 2012 वर्षानंतर एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यासाठी व्हिसाही अनेकदा नाकारल्याच्या घटना आहेत. परंतु आता तब्बल 55 वर्षांनी भारताचा टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
भारतीय टेनिस संघ भारतीय टेनिस संघ येत्या 29 आणि 30 नोव्हेंबरला किंवा 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये जाऊन डेविस कप खेळणार आहे. तसेच पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेची 4 नोव्हेंबरला एकदा तपासणी करून मगच खेळण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही भारतीय टेनिस संघटनेने स्पष्ट केले आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था समाधानकारक नसेल तर या सामन्यांचे आयोजन अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे.
All India Tennis Association: India vs Pakistan Davis Cup tie will take place at Islamabad either on 29th & 30th November or 30th & 1st December.However,security situation will be reviewed on November 4 whether the tie can be held in Islamabad or to be shifted to a neutral venue. pic.twitter.com/kmy9CVR4ft
— ANI (@ANI) September 13, 2019
दरम्यान पाकिस्तान आणि भारत संघाचा सामना 1964 साली लाहोरमध्ये झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4- 0 फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर 2006मध्ये दोन्ही देशांचा टेनिस सामना मुंबईत झाला होता. या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानला 3- 2ने पराभूत केले होते. यामुळे 13 वर्षानंतर डेव्हिस कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे.
पाकिस्तानचा दिग्गज टेनिसपटू अकिल खान याने मान्य केले आहे की, भारताने टेनिस खेळामध्ये पाकिस्तानच्या तुलनेने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारतासमोर विजय मिळवणे कठीण असणार आहे, पण अशक्य नाही. परंतु इस्लामाबाद येथे होणाऱ्या डेव्हिस कपमध्ये आम्ही भारताला नमवून विजय मिळवू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला. त्याचप्रमाणे भारत- पाकिस्तान टेनिस संघात सामना होत असल्याचा आनंद आहे. तसेच पाकिस्तानात देखील या सामन्याची खूप उत्सुकता लागली आहे. या दौऱ्यामध्ये भारताचा संघ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पाकिस्तानच्या टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्लाह खान यांनी सांगितले.