अखेर रवी शास्त्रीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी
By admin | Published: July 11, 2017 10:20 PM2017-07-11T22:20:27+5:302017-07-11T22:42:51+5:30
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. तर झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. त्याबरोबरच गेल्या महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. रवी शास्त्रीबरोबरच भारताच्या अन्य दोन माजी क्रिकेटपटूंकडे संघव्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी आज रात्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली.
Ravi Shastri appointed next coach of Team India, Zaheer Khan to be bowling coach: CK Khanna (Acting President, BCCI) pic.twitter.com/iqpsKsqaJB
— ANI (@ANI_news) July 11, 2017
Rahul Dravid appointed as overseas batting coach. Tenure of R Shastri, Z Khan & R Dravid will be till 2019 World Cup: Acting Pres CK Khanna
— ANI (@ANI_news) July 11, 2017