बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
By admin | Published: July 14, 2017 04:48 PM2017-07-14T16:48:48+5:302017-07-14T16:56:09+5:30
आयपीएलमध्ये पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - आयपीएलच्या ११ व्या मोसमात स्पर्धेमध्ये आमुलाग्र झालेले क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरचर दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. आता स्पर्धेत पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे. परवानगी मिळाल्याच धोनीला संघात कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आयपीएल २०१७ ची अंतिम फेरी आटोपल्यावर लगेचच चेन्नई सुपरकिंग्जने ट्विटरवरून पुनरागमनाची घोषणा केली होती. पण त्यांच्यावर घालण्यात आलेली बंदी आज अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. २०१३ साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची दीर्घ चौकशी चालली होती. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान ही बंदी संपुष्टात आल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेडच्या संचालकांपैकी एक असलेल्या जॉर्ज जॉन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत चर्चा करताना सांगितले की, "आम्हाला जर खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची संधी मिळाली तर आम्ही महेंद्रसिंग धोनीला संघात कायम ठेवू."
अधिक वाचा
अधिक वाचा
चेन्नई सुपरकिंग्जवर बंदी घालण्यात आल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. पण अपवाद वगळता त्याला पुण्याकडून म्हणावी तशी छाप पाडता आली नव्हती. दरम्यान दोन वर्षांच्या बंदीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जच्या ब्रँडला नुकसान झाले नसून अनेक प्रायोजक आमची माहिती घेत आहेत.