भारताच्या पराभवानंतर बांगलादेशी चाहत्याची रेल्वेखाली आत्महत्या
By Admin | Published: June 20, 2017 11:41 AM2017-06-20T11:41:20+5:302017-06-20T12:02:32+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे कोटयावधी फॅन्स निराश झाले. काहींनी टीव्ही सेट फोडून...
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 20 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे कोटयावधी फॅन्स निराश झाले. काहींनी टीव्ही सेट फोडून तर, काहींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचे पोस्टर्स जाळून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पण या सर्वांच्या उपर टीम इंडियाच्या एका बांगलादेशी चाहत्याने आपले आयुष्य संपवून घेतले.
बिद्युत असे या चाहत्याचे नाव असून तो अवघा 25 वर्षांचा होता. जमालपूर शांग गेट येथे राहणा-या बिद्युतला टीम इंडियाचा पराभव इतका जिव्हारी लागला की, त्याने थेट रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. बिद्युतला टीम इंडियाचा पाकिस्तानकडून झालेला पराभव पचवता आला नाही. तो इतका निराश झाला की, त्याने थेट आयुष्य संपवून टाकले.
आणखी वाचा
बिद्युतचे वडिल अनिसूर रहमान यांचे दुकान आहे. नासीरुल इस्लाम या पाकिस्तानी अधिका-याच्या हवाल्याने ढाका ट्रिब्युनने हे वृत्त दिले आहे. रविवारी रात्रीच बिद्युतने आत्महत्या केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले 338 धावांचे लक्ष्य पार करताना भारताचा डाव 158 धावात आटोपला. ब-याच वर्षानंतर पाकिस्तानने एखाद्या महत्वाच्या स्पर्धेत भारतावर इतका मोठा विजय मिळवला.
भारताचे स्थान कायम : ‘चॅम्पियन्स’ पोहचले सहाव्या स्थानावर
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे तर अंतिम फेरीत स्थान मिळवणारा भारतीय संघ तिसऱ्या स्थानी कायम आहे.पाकिस्तानने श्रीलंका व बांगलादेशला पिछाडीवर सोडताना २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी यजमान इंग्लंड आणि ३० सप्टेंबरपर्यंत अव्वल सात मानांकित संघांना थेट प्रवेश मिळणार आहे.
..आता इतर संघांनी पाकिस्तानात खेळावे
चॅम्पियन्स चषक पटकाविल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद हा अत्यंत भावुक झाला. चॅम्पियन बनल्यानंतरचा जल्लोष अजूनही थांबलेला नाही. हा चषक किती महत्त्वाचा आहे, हे सांगत त्याने इतर संघांना पाकिस्तानात खेळण्याचे आवाहनही केले.