पराभवानंतर टीम इंडियावर जोक्सचा पाऊस
By admin | Published: June 19, 2017 06:03 AM2017-06-19T06:03:38+5:302017-06-19T07:44:21+5:30
पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - चॅम्पियन्स स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत विजयश्री उंचावेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली. सोशल मीडियावर त्यांनी आपला राग व्यक्त केला. जोक्सचा पाऊस पाडला गेला. भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंना सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर विराटसेनेवरील जोक्सचा पाऊस पडत आहे. भारतीयांना एक वेळ ट्रॉफी जिंकून दिली नाही तरी चालेल, परंतु पाकिस्तानसोबतची हार मान्य नाही. मग ती हार क्रिकेट, कबड्डी, हॉकीच्या मैदानात असो. याच मानसिकतेचा प्रत्यय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर येत आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये अनेक वेळा नो बॉल टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहला सर्वात जास्त ट्रोल केले जात आहे. त्याचप्रमाणे जाडेजालाही ट्रोल केलं जात आहे. जाडेजाची तुलना बाहुबलीतील कटप्पाशी केली जात आहे. हार्दिक पंड्यला वाचवण्यासाठी त्याने आपली विकेट का दिली नाही असा प्रश्न सोशल माध्यमात उठत आहे. शून्यावर बाद होणाऱ्या रोहित शर्मासह धोनीसुद्धा नेटीझन्सचे टार्गेट झाला आहे.
सुरुवातीपासून उत्तम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या विराटसेनेने अत्यंत मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, दारुण पराभव स्वीकारला आणि तोही भारताच्या पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानसोबत. त्यामुळे भावनिक झालेल्या भारतीयांनी सोशल माध्यम निवडत टीम इंडियाला ट्रोल केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काही समजूतदार भारतीयांनी सोशल साइट्सवर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असभ्य भाषेत ट्रोल करणाऱ्यांना कमेंट्सच्या माध्यमातून उत्तरे देऊन टीम इंडिया आणि त्यांच्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. काही निवडक जोक्स आम्ही येथे देत आहोत.