इंग्लंडचा अर्धासंघ तंबूत ६ गडी बाद, १९० धावा

By Admin | Published: August 8, 2014 05:18 PM2014-08-08T17:18:32+5:302014-08-08T17:18:32+5:30

भारत व इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार व वरूण अरोन यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केल्याने सामना अत्यंत अटीतटीचा झाला आहे

After England's six-wicket haul in the semi-finals, 190 runs | इंग्लंडचा अर्धासंघ तंबूत ६ गडी बाद, १९० धावा

इंग्लंडचा अर्धासंघ तंबूत ६ गडी बाद, १९० धावा

googlenewsNext

ऑनलाइन टीम
मँचेस्टर, दि. ८ - भारत व इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार व वरूण अरोन यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केल्याने सामना अत्यंत अटीतटीचा झाला आहे. गुरुवारी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १५२ वर सर्वबाद अशी भारताची स्थिती होती. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय खेळाडूंचा टिकाव लागत नव्हता. कोणताही खेळाडूने ५० च्या पुढे धावा केल्या नव्हत्या. अपवाद फक्त कर्णधार धोनीचा. धोनीने ७० धावाकरत क्रिकेट रसिकांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. तर शुक्रवारी इंग्लंडची खेळी सुरू झाल्यावर इंग्लिश फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजांसमोर फारवेळ टिकता आले नाही. अ‍ॅलिस्ट कुक वरूणच्या गोलंदाजीवर खेळत असताना त्याचा पंकज सिंगने झेल घेतल्याने १७ धावांवर बाद झाला. तर सॅम रॉबसन जेमतेम सहा धावा करत त्रिफळाचीत झाला. गॅरी बॅलान्स वरूण गोलंदाजी करत असताना ३७ धावांवर पायचीत झाला. इयान बेल याने तब्बल ८ चौकार व एक षटकार लगावत अर्धशतक पुर्ण केले होते. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेटरसिकांना त्याच्या कडून आशा होत्या परंतू ५८ धावा झाल्यावर धोनीने झेल घेतल्याने तो बाद झाला. तसेच ख्रिस जॉर्डन १३ धावा करत आत्मविश्वासाने खेळत असतानाच वरुण अरोनकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. अवघ्या १३ धावांवर वरुणच्याच गोलंदाजीवर बाद होत मोईन अलीला तंबूत परतावे लागले.

Web Title: After England's six-wicket haul in the semi-finals, 190 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.