ललिता बाबरनंतर आता श्रद्धा घुलेही अडकणार लग्नबंधनात

By admin | Published: May 17, 2017 03:19 PM2017-05-17T15:19:09+5:302017-05-17T18:27:21+5:30

धावपटू ललिता बाबरनंतर आता अकोलेची सुवर्णकन्या श्रद्धा घुले हिचेही शुभमंगल ठरले आहे़. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महिला अ‍ॅथलिट खेळाडू या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत़.

After Lalitha Babar, now the marriage will get stuck in reverence | ललिता बाबरनंतर आता श्रद्धा घुलेही अडकणार लग्नबंधनात

ललिता बाबरनंतर आता श्रद्धा घुलेही अडकणार लग्नबंधनात

Next

आॅनलाईन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ १७ - धावपटू ललिता बाबरनंतर आता अकोलेची सुवर्णकन्या श्रद्धा घुले हिचेही शुभमंगल ठरले आहे़. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महिला अ‍ॅथलिट खेळाडू या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत़. प्रवरा काठच्या मातीतून घेतलेल्या उडीने आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच व तिहेरी उडी क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवलेली श्रद्धा भास्कर घुले ही गुजरात केडरमधील जिल्हाधिकारी पदावर रुजू होत असलेल्या रविंद्र ज्ञानेश्वर खताळे यांच्याशी विवाहबद्ध होत आहे़ श्रद्धा घुले हिने आत्तापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ६१ सुवर्णपदकांसह ११४ पदकांची कमाई केली आहे़ गुरुवारी सायंकाळी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये श्रद्धा घुले हिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होत आहे़. 
श्रध्दा घुलेचा विवाह सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील रविंद्र ज्ञानेश्वर खताळे यांच्याशी निश्चित झाला आहे़ रविंद्र खताळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते गुजरात केडरमध्ये जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत आहेत. जिल्हाधिकारी पदाचा प्रशिक्षण कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. 
महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने श्रद्धा घुलेचा गौरव केला आहे. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्वणकन्या ठरलेल्या श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत ६३ सुवर्ण (गोल्ड), २४ रौप्य (सिल्वर), २७ कास्य (ब्रॉन्झ) असे एकूण ११४ पदके पटकावली आहेत. २००७ साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे सर्व विक्रम मोडीत काढत १३.११ मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला़ २०१४ साली यशवंतराव चव्हाण क्रीडा युवती पुरस्काराने तर महाराष्ट्राचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. पटियाला येथे ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक वूमन’ अवॉर्ड तिला प्राप्त झाला आहे.

Web Title: After Lalitha Babar, now the marriage will get stuck in reverence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.