एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने अभाविपचे नाशकात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:45 PM2021-03-11T18:45:58+5:302021-03-11T18:46:44+5:30
राज्यात कोणाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने, आता परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. (MPSC exam)
नाशिक: एमपीएससी (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने कॉलेजरोडवरील टी ए कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (After postpone MPSC exam ABVP agitation in Nashik)
राज्यात कोणाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने, आता परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएससीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले.