रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य...

By admin | Published: September 11, 2016 07:11 AM2016-09-11T07:11:11+5:302016-09-11T14:19:17+5:30

अमेरिकन खुल्या टेंनिस स्पर्धेत महिला गटातील अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या करेलीना प्लीस्कोव्हाला तीन सेटमध्ये ६-३ व ४-६ व ६-४असे नमवुन जर्मनीच्या अंजिलिक केर्बरने विजेतेपद पटकावले

After the silver medal of the Rio Olympics, Kurban Ajinkya in the US Open ... | रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य...

रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य...

Next

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. ११ : रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदकापाठोपाठ जर्मनीच्या अंजिलिक कर्बरने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचेही विजेतेपद पटकावले आहे. कर्बरने  महिला गटातील अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या करेलीना प्लीस्कोव्हाला तीन सेटमध्ये ६-३ व ४-६ व ६-४असे नमवले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या केर्बरने सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवली होती.

कर्बरने पहिला सेट  ६-३ असा सहज जिंकला मात्र, दुसऱ्या सेटमध्ये प्लीस्कोव्हाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात पुनरागमन करताना तिने केर्बरची सर्विस भेदून सेट ६-४ असा जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये केर्बरने आक्रमक खेळ करत ६-४ असा सेट जिंकला. केर्बरचे हे दूसरे ग्रैंडस्लॅम विजेतेपद आहे. या विजेतेपदानंतर केर्बरने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांवर झेप घेतली आहे. 

Web Title: After the silver medal of the Rio Olympics, Kurban Ajinkya in the US Open ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.