विश्वचषकातून युवी बाद , जाडेजा, बिन्नीचा संघात समावेश

By admin | Published: January 6, 2015 03:20 PM2015-01-06T15:20:48+5:302015-01-06T15:31:03+5:30

विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या अंतिम १५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघात युवराज सिंगला स्थान मिळू शकलेले नाही.

After the U.V. in the World Cup, Jadeja, Binny's team included | विश्वचषकातून युवी बाद , जाडेजा, बिन्नीचा संघात समावेश

विश्वचषकातून युवी बाद , जाडेजा, बिन्नीचा संघात समावेश

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या अंतिम १५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघात युवराज सिंगला स्थान मिळू शकलेले नाही. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा आणि ईशांत शर्मा या दोघांचाही संघात स्थान मिळाले असून विश्वचषकापूर्वी ते दोघेही तंदुरुस्त होतील असा दावा बीसीसीआयने केला आहे.

१४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विश्वचषक होणार असून यासाठी मंगळवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात निवड समितीने अंतिम १५ खेळाडूंची नावे निश्चित केली. दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजाऐवजी युवराज सिंगला संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र निवड समितीने युवराज ऐवजी जाडेजाला पसंती दिली. स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, उमेश यादव या नव्या चेह-यांना विश्वचषकात संधी मिळाली आहे. 

विश्चषकाासाठी भारतीय संघ 

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.

 

Web Title: After the U.V. in the World Cup, Jadeja, Binny's team included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.