विराट बाद, भारत ३ बाद २७९
By admin | Published: February 15, 2015 11:10 AM2015-02-15T11:10:13+5:302015-02-15T12:29:22+5:30
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या आधारे भारताने ३ बाद २७९ धावा केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
अॅडिलेड, दि. १५ - वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतक झळकावत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. भारताने ४६ षटकांत ३ गडी गमावत २७९ धावा केल्या आहेत.
वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. खराब फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन - कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. विराट कोहलीने दमदार शतक ठोकले. कोहली १०७ धावांवर बाद झाला आहे. सध्या खेळपट्टीवर रैना नाबाद ७२ तर धोनी नाबाद सहा धावांवर खेळत आहे.