मालिका विजयानंतर धोनीचा कोहलीला गिफ्टसह कानमंत्र

By admin | Published: January 24, 2017 11:55 AM2017-01-24T11:55:54+5:302017-01-24T12:51:07+5:30

माजी कर्णधार एम.एस धोनीने विजयाची साक्ष म्हणून आजपर्यंत ३२० स्टम्प गोळा केले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी धोनीने कर्णधारपदाची सूत्रे विराट कोहलीकडे दिली होती.

After winning the series, Dhoni's Kohli gift card | मालिका विजयानंतर धोनीचा कोहलीला गिफ्टसह कानमंत्र

मालिका विजयानंतर धोनीचा कोहलीला गिफ्टसह कानमंत्र

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - माजी कर्णधार एम.एस धोनीने विजयाची साक्ष म्हणून आजपर्यंत ३२० स्टम्प गोळा केले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी धोनीने कर्णधारपदाची सूत्रे विराट कोहलीकडे दिली होती. विराट कोहलीने पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिलाचं मालिका विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या कटक येथिल दुसऱ्या सामन्यासह भारताने मालिका विजय मिळवल्याचे निश्चित झाल्यानंतर माजी कर्णधार धोनीने विराटला एक कानमंत्र दिला.

कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंकतर मिळालेला हा विजय कोहलीसाठी आयुष्यभर संस्मरणात रहावा, म्हणून धोनीने कोहलीला त्या सामन्यातील बॉल भेट दिला. त्याचप्रमाणे महत्वाच्या सामन्यातील विजयानंतर बॉलचा संग्रह करण्याचा सल्ला देखील धोनीने विराटला दिला आहे. अनपेक्षित गिफ्टमुळे भारावलेल्या कोहलीने हसऱ्या चेहऱ्याने ही भेट स्वीकारली. नंतर कॅप्टन कूल अशी ख्याती असलेल्या धोनीचा ऑटोग्राफही कोहलीने त्या बॉलवर घेतला.

(अवलिया..कोहलीसाठी विकले आईचे दागिने)
 
(अनुभवी धोनीचे न ऐकणे विराटला पडले महागात..!)
 
(भारत व इंग्लंड संघ पहिल्या टी-२० साठी कानपूरमध्ये दाखल)
हल्लीच्या सामन्यांमध्ये महागडे स्टम्प वापरले जातात, ते आम्हाला घरी घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे एमएस (धोनी)ने मला सामन्यात वापरलेला बॉल गिफ्ट केला. ही तुझी पहिलीच वनडे मालिका आहे, आणि ती तुझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असं धोनी तो बॉल देताना म्हणाला. ते माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. मी त्याच्याकडून त्या बॉलवर स्वाक्षरीपण घेतली, अशी माहिती कोलकाता वन डे नंतर कोहलीने बीसीसीआयशी बोलताना दिली.

 

Web Title: After winning the series, Dhoni's Kohli gift card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.