पुन्हा "जिंक्स" फॅक्टर आणि मुंबईचा भेदक मारा

By admin | Published: May 22, 2017 02:21 AM2017-05-22T02:21:14+5:302017-05-22T02:21:14+5:30

आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला

Again hit the "Jinx" factor and Mumbai | पुन्हा "जिंक्स" फॅक्टर आणि मुंबईचा भेदक मारा

पुन्हा "जिंक्स" फॅक्टर आणि मुंबईचा भेदक मारा

Next

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत

हैदराबाद , दि. 22 - आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला. अंतिम लढतीत मुंबईला पुन्हा एकदा जिंक्स फॅक्टर म्हणजेच अजिंक्य रहाणेचा सामना करावा लागला.
बुमराह, मलिंगा, जॉन्सन या तिकडीने अचूक आणि भेदक गोलंदाजीने हा सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सच्या पुणे संघाविरोधातील विजयाचा मोठा अडसर ठरला होता तो जिंक्स म्हणजेच अजिंक्य रहाणे. रहाणेने मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यात नेहमीच मोठी धावसंख्या उभारली होती. फायनलमध्येही तो मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. मात्र संघाच्या धावगतीने अखेरच्या क्षणात पुण्याचा एका धावेने घात झाला. पुण्याचा विजयासाठी एक धाव उणी पडली. हैदराबादच्या उप्पल स्टेडिअमची संथ खेळपट्टी पाहता मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या गोलंदाजांना अफलातून मारा करताना मुंबईला अडचणीत आणले. मुंबई शंभरीही पार करेल का प्रश्न निर्माण झाला. मात्र संघाचे संतुलन ठेवणारा अष्टपैलु कृणाल पांड्याने याने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे मुंबईने १२९ धावा केल्या. आयपीएलच्या अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या होती. पुण्याची सुरूवातही दमदार झाली. साखळी फेरीत आणि क्वालिफायर १ च्या
सामन्यात मुंबईसमोर उभा ठाकणाऱ्या अंजिक्य रहाणे याने स्मिथच्या साथीने ५४ धावांची भागिदारी केली. रहाणेला चौथ्याच षटकांत जीवदान मिळाले होते.
त्याचा त्याने फायदा घेतला. मात्र दुसऱ्या बाजुने स्मिथ संथ खेळत होता. नंतर स्मिथने धावांचा वेग वाढवला पण तो पर्यंत बहुदा वेळ निघून गेली होती. यॉर्करमॅन बुमराह आणि मलिंगा यांनी डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या अचुक माऱ्याच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. अखेरच्या षटकांत पुण्याला विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. त्यातच मनोज तिवारीने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. मात्र मिशेल जॉन्सन याने पुण्याच्या फलंदाजांना अनुभव काय असतो हे दाखवून दिले. मुंबईचा विक्रमी विजय मुंबईने तीन वेळेस या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या आधी मुंबईने २०१३ आणि २०१५ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यासोबतच केकेआर आणि सीएसकेने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. आॅरेंज कॅप - सनराजयर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनी दोन वेळा आॅरेंज कॅप पटकावली आहे. वॉर्नरने २०१५ आणि २०१७ मध्ये तर गेल याने २०११ आणि २०१२ मध्ये आॅरेंज
कॅप पटकावली होती.
पर्पल कॅप - ब्राव्हो याने २०१३ आणि २०१५ मध्ये तर भुवनेश्वर कुमार याने २०१६ आणि २०१७ मध्ये पर्पल कॅप दोन वेळा पटकावली
एकाच संघातील खेळाडूंनी आॅरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावण्याचा विक्रम या सत्रात झाला आहे. हैदराबादच्या वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांनी ही कामगिरी केली तर या आधी २०१३ मध्ये सीएसकेच्या माईक हसी आणि ब्राव्हो
यांनी ही कामगिरी केली होती.

महेंद्र सिंह धोनी या हा आयपीएल अंतिम लढतीतील सलग चौथा पराभव आहे. त्याने याआधी सीएसकेकडून २०११ च्या विजेतेपदानंतर २०१२,२०१३,२०१५ अंतिम फेरी गाठली होती. त्यात पराभूत व्हावे लागले. तर यंदा त्याने पुणे संघाकडून अंतिम फेरी गाठली मात्र आताही पराभवच पदरी पडला. धोनीने आयपीएलच्या सात अंतिम लढती खेळल्या त्यातील पाच अंतिम लढतीत पराभव स्विकारला आहे. त्या खालोखाल सुरेश रैना चार अंतिम लढतीत पराभव पत्करावा
लागला.

Web Title: Again hit the "Jinx" factor and Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.