‘आक्रमक’ भारताविरुद्ध मालिका रोमहर्षक ठरेल
By admin | Published: January 9, 2016 03:26 AM2016-01-09T03:26:12+5:302016-01-09T03:26:12+5:30
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आक्रमक खेळण्यात पारंगत आहे त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका रोमहर्षक ठरेल
पर्थ : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आक्रमक खेळण्यात पारंगत आहे त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका रोमहर्षक ठरेल, अशी आशा आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी व्यक्त केली.
पाच वनडे आणि तीन टी-२0 सामन्यांच्या मालिकेस येथे १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजवरील दणकेबाज विजय मिळवणारा आॅस्ट्रेलिया आता भारताविरुद्ध या मालिकेविषयी खूप उत्साहित आहे.
आॅस्ट्रेलियाला नुकताच निवृत्ती पत्करणारा मिशेल जॉन्सन आणि जखमी मिशेल स्टार्क यांच्या अनुभवाची उणीव भासेल; परंतु लेहमन यांच्यानुसार युवा खेळाडू आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहेत. ते म्हणाले, ही बाब युवा खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल. आम्ही उच्च पातळीवर क्रिकेट खेळतो आणि भारतही असाच खेळतो. त्यामुळे ही मालिका रोमहर्षक ठरेल.’
लेहमन यांच्यानुसार त्यांच्या संघाला कसोटीनंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळण्यात फारशी अडचण येणार नाही. ते म्हणाले की, आमचे खेळाडू वेगााने त्यांची मानसिकता बदलतात आणि आम्ही संघात काही बदलही केले आहेत. खेळाडू काही टी-२0 सामने पांढऱ्या चेंडूने खेळले असल्याने ही चांगली बाब आहे.
सीनियर खेळाडूंविषयी विचारले असता त्यांनी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वॉर्नर आणि स्मिथ निश्चितच खेळतील. वॉर्नर लवकरच दुसऱ्या मुलांचा पिता बनणार आहे; परंतु त्याला अजून वेळ आहे
आणि खेळण्यास तो आतुर आहे. हे आधी झाले असते तर आमच्याकडे त्याचे स्थान घेण्यासाठी अतिरिक्त फलंदाज आहे.’(वृत्तसंस्था)भारताचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यांचा संघ तुल्यबळ असल्यामुळे आम्हाला त्यांच्याविरुद्ध चांगली सुरुवात करावी लागेल. आम्ही बऱ्याच कालावधीपासून पर्थ येथे खेळलो नाही. त्यामुळे ही बाब आमच्यासाठी रोमहर्षक आहे. आपल्या मते, येथील खेळपट्टी वेगवान आणि उसळी घेणारी आहे. भारतीय संघ आक्रमक क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे पुढील पाच सामन्यांत यात काही बदल होईल असे मला वाटत नाही.
- डॅरेन लेहमन