फुटबॉल विकासात एआयएफएफने भूमिका बजवावी : सौरभ गांगुली

By admin | Published: July 9, 2015 12:58 AM2015-07-09T00:58:22+5:302015-07-09T00:58:22+5:30

भारतीय फुटबॉलचा स्तर अत्यंत निम्न असल्याने निराश झालेला माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याने अ. भा. फुटबॉल महासंघाने देशात या खेळाच्या विकासासाठी सक्रिय भूमिका वठविताना बीसीसीआयकडून बोध घ्यावा,

AIFF should play a role in the development of football: Sourav Ganguly | फुटबॉल विकासात एआयएफएफने भूमिका बजवावी : सौरभ गांगुली

फुटबॉल विकासात एआयएफएफने भूमिका बजवावी : सौरभ गांगुली

Next

कोलकाता : भारतीय फुटबॉलचा स्तर अत्यंत निम्न असल्याने निराश झालेला माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याने अ. भा. फुटबॉल महासंघाने देशात या खेळाच्या विकासासाठी सक्रिय भूमिका वठविताना बीसीसीआयकडून बोध घ्यावा, असे मत मांडले.
भारताला २०१८च्या विश्वचषक पात्रता फेरीच्या लढतीत मागच्या महिन्यात गुआमकडून १-२ने पराभवाचा सामना करावा लागला. हा संघ भारताच्या तुलनेत फिफा रँकिंगमध्ये ३३ स्थानांनी मागे आहे. एटलेटिको डी कोलकाताचा सहमालक असलेला सौरभ म्हणाला, ‘‘कुठल्याही खेळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्था
असेल, तर यश हमखास
मिळते. आयएसएल केवळ दोन
महिने असेल. आयएसएलची व्यवस्था ही भारतीय फ्रँचायसींसाठी असेल; पण माझ्या मते भारतीय फुटबॉलला प्रगती साधायची झाल्यास एआयएफएफला आयएसएलच्या सहकार्याने मोठी भूमिका
बजवावी लागेल.’’
सौरभ पुढे म्हणाला, ‘‘ज्या पद्धतीने बीसीसीआयद्वारे आयपीएल चालविले जाते, त्याच पद्धतीने एआयएफएफने आयएसएलच्या माध्यमातून खेळाडंूना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. आयएसएल मागच्याच वर्षी सुरू झाले. याचा लाभ भारतीय खेळाडूंना होत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: AIFF should play a role in the development of football: Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.