अय्यरला आघाडीचे श्रेयस

By admin | Published: February 26, 2016 03:58 AM2016-02-26T03:58:28+5:302016-02-26T03:58:28+5:30

सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने (११७) केलेली शतकी खेळी व सूर्यकुमार यादवच्या (४८) उपयुक्त फलंदाजीने मुंबईने पहिल्या डावांत ८ बाद २६२ धावा करून पहिल्या

Aiyar leads the front | अय्यरला आघाडीचे श्रेयस

अय्यरला आघाडीचे श्रेयस

Next

पुणे : सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने (११७) केलेली शतकी खेळी व सूर्यकुमार यादवच्या (४८) उपयुक्त फलंदाजीने मुंबईने पहिल्या डावांत ८ बाद २६२ धावा करून पहिल्या डावांत २७ धावांची आघाडी घेतली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रणजी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. सौराष्ट्राने पहिल्या डावांत दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला. सलामीवीर फलंदाज अखिल हेडवारकरला (०) जयदेव उनादकटने शेल्डन जॅक्सनकरवी झेलबाद केले. पाठोपाठ भाविन ठक्करला त्रिफळाबाद करून उनादकटने दुसरा झटका दिला.
त्यामुळे मुंबईची अवस्था १ बाद ० वरून २ बाद २३ अशी बिकट झाली. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरून मुक्त फलंदाजी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १५२ धावांची भागीदारी केली. श्रेयसने १४२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांच्या साह्याने ११७ धावा फटकावल्या, तर सूर्यकुमारने ११२ चेंडूंत ७ चौकारांच्या साह्याने ४८ धावा केल्या. चिराग जानीने श्रेयसला अप्रीत वासवदाकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली. त्यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. अभिषेक नायर (१९), धवल कुलकर्णी (१) व शार्दूल ठाकूर (०) यांना हार्दिक राठोडने किरकोळीत बाद केले. कुलकर्णी व ठाकूर ६४व्या षटकात पाठोपाठच्या चेंडूंवर तंबूत परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेश लाड २२, तर इक्बाल अब्दुल्लाह ९ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, सौराष्ट्राने कालच्या ८ बाद १९२ धावांवरून खेळाला सुरुवात केली. प्रेरक मंकड कालच्या ५५ धावांत ६६पर्यंत भर घालून तंबूत परतला.
धवल कुलकर्णीने सूर्यकुमार यादव याच्याकरवी झेलबाद करून डावातील पाचवा बळी मिळविला. तर, जयदेव उनादकट याने २६ चेंडूंत ३१ धावा फटकावून संघाचा धावफलक २३५ पर्यंत नेला. शार्दूल ठाकूरने जयदेवला अखिल हेरवाडकरे झेल देण्यास भाग पाडून सौराष्ट्रचा डाव संपुष्टात आणला.

धावफलक
सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्वबाद १९२, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड ६६, जयदेव उनादकट ३१, धवल कुलकर्णी ५/४२, शार्दूल ठाकूर ३/८९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१,
मुंबई पहिला डाव : ६६ षटकांत ८ बाद २६२, अखिल हेरवाडकर ०, भाविन ठक्कर ६, श्रेयस अय्यर ११७, सुर्यकुमार यादव ४८, आदित्य तारे १९, सिद्धेश लाड नाबाद २२, इक्बाल अब्दुल्लाह नाबाद ९, जयदेव उनादकट २/५५, हार्दिक राठोड ४४/३, चिराग जानी २/४६, दीपक पुनिया १/९३.

Web Title: Aiyar leads the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.