अजाज, जयवंती याचे एकहाती वर्चस्व

By admin | Published: July 20, 2016 05:12 AM2016-07-20T05:12:31+5:302016-07-20T05:12:31+5:30

अजाज शेख आणि ठाणेकर जयवंती देशमुख यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टरचा किताब पटकावताना दबदबा राखला.

Ajaaz, Jayawanti's monopoly overruns | अजाज, जयवंती याचे एकहाती वर्चस्व

अजाज, जयवंती याचे एकहाती वर्चस्व

Next


मुंबई : नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईकर अजाज शेख आणि ठाणेकर जयवंती देशमुख यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टरचा किताब पटकावताना दबदबा राखला. त्याचवेळी मुंबई शहर संघाने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखताना दोन्ही गटाच्या सांघिक विजेतेपदावर कब्जा केला.
कलिना येथील इंडियन एअरलाइन्स कॉलनी येथे झालेल्या या स्पर्धेत अजाजने ६९ किलोवजनी गटात वर्चस्व राखल्यानंतर अंतिम फेरीतही सर्वाधिक वजन उचलताना बाजी मारली. त्याने ६९ किलोवजनी गटात एकूण २५२ किलोचा भार उचलला. १०५ किलोवजनी गटात तब्बल ३०० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केलेल्या अनुप कदमलाही अंतिम फेरीत अजाजला रोखणे शक्य झाले नाही. त्याचवेळी महिलांमध्ये ४८ किलोवजनी गटात बाजी मारलेल्या जयवंती यांनी अंतिम फेरीतही वर्चस्व राखताना विजेतेपद उंचावले. ४८ किलोवजनी गटात एकूण १४१ किलो उचलताना जयवंतीने वर्चस्व राखले. तर गनिता चव्हाण व नेहल भिलारे यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे ६३ किलोवजनी गटात १४५ किलोवजनाचे भार उचलेल्या शोभा इंगळेने जयवंतीला कडवी झुंज दिली. मात्र तीला पिछाडीवर टाकण्यात शोभा अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)
गटनिहाय निकाल : पुरुष : ५६ किलोगट : १. राहुल जाधव (ठाणे), २. साहिल जाधव (ठाणे), ३. अमृत नांगरे (मुंबई). ६२किलोगट : १. सुनिल सकपाळ (मुंबई), २. प्रतिक कदम (मुंबई), ३. रवी कुमार (मुंबई).
६९किलोगट : १. अजाज खान (मुंबई), ईश्वर इमले (मुंबई), सचिन पवार
(मुंबई).
७७ किलोगट : १. अजिंक्य शेनोडे (मुंबई), २. शिवाजी महाजन (मुंबई), ३. प्रणित शिंदे (मुंबई).
८५ किलोगट : १. सुशांत साळवी (मुंबई), २. सुरेश प्रसाद (मुं. उपनगर), ३. निरंजन एपिली (मुंबई).
९४ किलोगट : १. घनश्याम देसाई (मुंबई), २. तेजस मराठे (मुं. उपनगर), ३. ज्योतिश किर्तुनिया (मुं. उपनगर).
१०५ किलोगट : १. अनुप कदम (मुंबई), २. क्रिष्णा मढवी (ठाणे), ३. अजित पाटील (मुं. उपनगर). १०५ हून अधिक : १. मनोज मोरे (मुंबई), २. रेमंड जॉर्ज (मुंबई), ३. योगेश भोसले (मुं. उपनगर).

Web Title: Ajaaz, Jayawanti's monopoly overruns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.