भारतीय संघाची धुरा अजय रेड्डीकडे

By Admin | Published: December 22, 2016 12:27 AM2016-12-22T00:27:09+5:302016-12-22T00:27:09+5:30

पुढील वर्षी २८ जानेवारीपासून भारतात रंगणाऱ्या अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघाची घोषणा झाली

Ajay Reddy, the Indian team's ax | भारतीय संघाची धुरा अजय रेड्डीकडे

भारतीय संघाची धुरा अजय रेड्डीकडे

googlenewsNext

मुंबई : पुढील वर्षी २८ जानेवारीपासून भारतात रंगणाऱ्या अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघाची घोषणा झाली. १७ सदस्यांच्या या संघाचे नेतृत्व आंध्र प्रदेशच्या अजय कुमार रेड्डीकडे सोपविण्यात आले आहे. तसेच, कर्नाटकच्या प्रकाश जयरामैहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघात नाशिकचा अनिश बेग हा एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे.
भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे (सीएबीआय) अध्यक्ष महंतेश जीके यांनी बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमात भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडणे खूप आव्हानात्मक ठरले. १० राज्यांतून एकूण १७ खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.’
कर्णधार अजय रेड्डी याने संघाच्या तयारीबाबत सांगितले की, ‘इंदोर येथे ५ जानेवारीपासून संघाचे सराव शिबिर सुरू होईल. प्रत्येक खेळाडूने संघात स्थान मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही पुन्हा एकदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहोत. जेतेपद पटकाविण्यासाठी संघातील खेळाडू झोकून खेळतील यात शंका नाही.’
त्याचप्रमाणे राष्ट्रीय संघटना सीएबीआयविषयी अजय म्हणाला, ‘संघटनेने या क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली आहे. याआधी आम्हाला पुरेसे किटही घेता येत नव्हते. खेळाचे साहित्य कधीच पुरेसे नसायचे. मात्र, सीएबीआयने आमच्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. संघटनेच्या मेहनतीमुळे आम्ही आज जे काही मिळवलंय त्याहून अधिक चांगली कामगिरी करू. सीएबीआयमुळे मी घडलो आहे,’ असेही अजयने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Ajay Reddy, the Indian team's ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.