अजय शिर्के यांच्यावर मानहानीचा आरोप होऊ शकतो
By admin | Published: September 22, 2016 05:41 AM2016-09-22T05:41:26+5:302016-09-22T05:41:26+5:30
बीसीसीआयच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवडून आलेले अजय शिर्के यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवडून आलेले अजय शिर्के यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश लोढा समितीच्या जवळील सूत्रांनी सांगितली. शिर्के यांनी जाहीर केलेल्या पत्रामधील एका टिप्पणीबाबत समितीला आक्षेप असल्याचे कळले आहे. त्याचबरोबर बुधवारी मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधरण
सभेचा अहवालही बीसीसीआयने सादर केला नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या सभेमध्ये बीसीसीआयने घेतलेल्या सर्व
आठही निर्णयावर समिती गांभीर्याने लक्ष देत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या बीसीसीआयने घेतलेले सर्व आठ निर्णय लोढा समिती शिफारशींच्या उल्लंघन करणाऱ्या आहेत. शिवाय शिर्के यांनी काढलेल्या पत्रामध्ये उल्लेख होता की, समितीचे सचिव गोपाळ शंकरनारायण यांनी कथितपणे निवडकर्त्यांच्या चारित्र्यावर चुकीची टीका केली आहे. समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी शिर्के यांना मानहानीच्या आरोपाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)