उमद्या खेळाडूला महाराष्ट्र मुकला : अजित पवार
By admin | Published: February 3, 2015 01:16 AM2015-02-03T01:16:46+5:302015-02-03T01:16:46+5:30
च्केरळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचा नेटबॉल संघाचा १९ वर्षीय खेळाडू मयुरेश पवार याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यु झाला.
च्केरळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचा नेटबॉल संघाचा १९ वर्षीय खेळाडू मयुरेश पवार याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यु झाला. मयुरेश्वरच्या मृत्युमुळे उमद्या खेळाडूला महाराष्ट्र मुकला आहे. अशा शब्दात महाराष्ट्र आॅलंपिक संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेता अजित पवार यांनी आपला शोक व्यक्त केला.
च्अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आपल्या कौशल्याच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील मायणी सारख्या छोट्या गावातील मयुरेश पवार याने महाराष्ट्राच्या नेटबॉल संघात स्थान मिळविले होते. केवळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत होता. खेळातील निपूण कौशल्यामुळेच १९ वर्षीय मयुर ज्युनिअर गटात मोडत असूनही त्याला सिनीअर गटातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती. सोमवारी सकाळी इनडोअर स्टेडीयममध्ये तो चंदीगड विरुद्धचा सामना खेळला होता.