अक्रम

By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:59+5:302015-02-21T00:49:59+5:30

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब

Akram | अक्रम

अक्रम

Next
शाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब
वसीम अक्रम यांचा कॉलम
माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते. पण, त्यानंतर या सर्व अडचणी सोडविण्यात यश आले. ही बाब आता समोर आल्यामुळे याची सांगड भारताविरुद्धच्या पराभवासोबत घालण्यात येत आहे; पण असे काहीच नाही, याची मी हमी देतो.
माझा एकेकाळचा सहकारी वकार संघाचा मुख्य प्रशिक्षक असून, त्याच्याकडे जोखिमीचे काम आहे. संघाला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्याला काही योजना आखावी लागणार आहे, पण खेळाडूंनीही काही रणनीती तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक वेळी प्रशिक्षकावर विसंबून राहू शकत नाही; कारण संघातील खेळाडू काही १५ वर्षांची मुले नाहीत.
संघातील खेळाडूंसाठी १०.३० च्या आता घरात, ही योजना माझ्या आकलनापल्याड आहे. आपण २१ व्या शतकात वावरत असताना खेळाडूंवर कर्फ्यू लावणे चुकीचे आहे. इम्रान खान कर्णधार असताना आम्हाला कधीच अशा समस्येला सामोरे जावे लागले नाही.
पाक संघाला आता वेस्ट इंडीजच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विंडीजविरुद्ध आयर्लंड संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. जेसन होल्डरला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, याची मला चांगली कल्पना आहे. २४ व्या वर्षी कर्णधारपदाची जबाबदारी आणि सीनिअर खेळाडूंचे समर्थन नसणे, अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. विंडीजचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा खेळाडू जगातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत आहेत. विंडीज निवड समितीने ड्वेन ब्राव्हो व किरोन पोलार्ड यांच्यासारख्या दोन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे संघाच्या निराशाजनक कामगिरीचा मार्ग निवड समितीनेच निश्चित केल्याचे दिसून येते.

Web Title: Akram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.