अक्रमचे ५० व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी

By admin | Published: June 3, 2016 01:28 PM2016-06-03T13:28:58+5:302016-06-03T13:28:58+5:30

पाकिस्तानचा महान गोलंदाज वसिम अक्रमने आज वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. वसिमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या त्याच्या विषयीच्या खास गोष्टी.

Akram's 50th Year debut, Learn about special things for him | अक्रमचे ५० व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी

अक्रमचे ५० व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी

Next

ऑनलाइन लोकमत 

पाकिस्तानचा महान गोलंदाज वसिम अक्रमने आज वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. ३ जून १९६६ रोजी जन्मलेल्या वसिमने वयाच्या १८ व्या वर्षी पाकिस्तानी क्रिकेट संघात पदार्पण केले. वसिमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या त्याच्या विषयीच्या खास गोष्टी.
 
१) वसिम अक्रम इमरान खानचा चेला म्हणून ओळखला जातो. पण वसिमला पाकिस्तानी संघात जावेद मियाँदादने आणले. मियाँदाद पाकिस्तानचा कर्णधार असताना त्याने अक्रममधील टँलेट हेरले व त्याला पाकिस्तानी संघात आणले. अक्रम पाकिस्तानी संघात आला तेव्हा इमरान खान संघाबाहेर होता. १९८५ साली इमरानने पाकिस्तानी संघात पुनरागमन केले व तिथून दोघांमध्ये गुरु-शिष्याचे नाते तयार झाले. 
 
२)  १९८४ साली न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौ-यावर आला होता. तेव्हा मियाँदादला अक्रमबद्दल समजले. नोव्हेंबर १९८४ साली रावळपिंडीमध्ये पाकिस्तान अध्यक्षीय संघ आणि न्यूझीलंड संघामध्ये सराव सामन झाला. पहिल्या डावात अक्रमने सात विकेट घेऊन निवड समिती सदस्यांवर आपली छाप पाडली. 
 
३) अक्रमने सर्वप्रथम न्यूझीलंडचा परदेश दौरा केला. दौ-यावर जाण्याची तयारी करत असताना अक्रमने कर्णधार मियाँदादला सोबत किती पैसे घेऊ असे विचारले होते. आपण देशासाठी खेळतो तेव्हा पीसीबीकडून दौ-याचा खर्च उचलला जातो हे अक्रमला त्यावेळी माहित नव्हते.
 
४) पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळताना अक्रम शारीरीकदृष्टया तंदुरुस्त होता, पण वयाच्या ३० व्या वर्षी मधुमेहाची लागण झाली. 
 
५) अक्रम 'त्या' वेळचा सर्वात धोकादायक गोलंदाज होता. वेग, दिशा आणि दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते. अक्रमने कारकीर्दीत चारवेळा हॅटट्रीक घेतली. दोनदा वनडे आणि दोनदा कसोटीमध्ये हॅटट्रीक घेतली. १९८९ आणि १९९० सलग दोनवर्षात दोनवेळा लागोपाठ हॅट्रीक घेतली. दोन्ही हॅटट्रीक शारजामध्ये घेतल्या. १९९९ साली श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये अक्रमने लागोपाठ दोन हॅटट्रीक घेतल्या.  
 
६) २००३ वर्ल्डकपच्यावेळी अक्रमने वनडेमध्ये ५०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज होता. त्याने एकूण ५०२ विकेट घेतल्या. नंतर त्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुरलीधरनने मोडला. मुरलीधरन आणि अक्रम असे दोनच गोलंदाज आहेत ज्यांचे कसोटी आणि वनडेमध्ये मिळून प्रत्येकी ४०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. 
 
७) कसोटीमध्ये ४१४ विकेट घेणारा अक्रम कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नववा गोलंदाज आहे. 
 
८) अक्रम क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ठरलेला डावखुरा गोलंदाज आहे. कसोटी आणि वनडेमध्ये इतके बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज आहे. 
 
९) वसिमचे वडील चौधरी मोहोम्मद अक्रम यांचे १९९० साली अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी दिवसभरासाठी त्यांना बंधक बनवून ठेवले व मारहाण केली. 
 
१०) अक्रमची पहिली पत्नी हुमा मानसोपचार तज्ञ होती. तिने काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंबरोबर क्रिडाविषयक काम केले होते. त्यात अक्रमही होता. अवयव निकामी झाल्यामुळे २००९ मध्ये चेन्नईतील रुग्णालयात हुमाचे निधन झाले. त्यानंतर २०१३ मध्ये अक्रमने ऑस्ट्रेलियन तरुणीबरोबर विवाह केला. 
 
११) पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद असले तरी, अक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. 
 
१२) पाच ऑगस्ट २०१५ मध्ये कराचीच्या नॅशनल स्टेडियमजवळ अक्रमवर हल्ला केला. पण सुदैवाने तो यातून बचावला.
 

Web Title: Akram's 50th Year debut, Learn about special things for him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.