अक्षर पटेलचे कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे मानांकन

By admin | Published: June 21, 2016 02:11 AM2016-06-21T02:11:20+5:302016-06-21T02:11:20+5:30

भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने सोमवारी जाहीर वन-डे गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान पटकावले,

Akshar Patel's career best 13th standard | अक्षर पटेलचे कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे मानांकन

अक्षर पटेलचे कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे मानांकन

Next

दुबई : भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने सोमवारी जाहीर वन-डे गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान पटकावले, तर जसप्रीत बुमराह व धवल कुलकर्णी यांनी झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर क्रमवारीतील स्थानामध्ये प्रगती केली आहे.
पटेलने झिम्बाब्वेविरुद्ध तीन बळी घेतले. तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज रविचंद्रन आश्विनच्या तुलनेत तीन स्थानांनी पिछाडीवर आहे. वेगवान गोलंदाज बुमराह मालिकेत ९ बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज
ठरला आहे. त्याने मानांकनामध्ये
प्रगती करताना ९७ वे स्थान पटकावले. पाच बळी घेणाऱ्या कुलकर्णीने २९ स्थानांची
प्रगती करताना ८८ वे स्थान पटकावले आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Akshar Patel's career best 13th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.