जिल्हा खो-खो स्पर्धेत अलंगुण, देवलदरीचे संघ अजिंक्य
By admin | Published: January 5, 2015 10:04 PM2015-01-05T22:04:17+5:302015-01-06T00:21:38+5:30
नाशिक : जिल्हा खो-खो संघटना आणि महाराष्ट्र क्र ीडा विकास समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किशोर खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अलंगुण येथील आश्रमशाळेचा, तर मुलींच्या गटात देवल शाळेच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले़

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या स्पर्धा पार पडल्या़ मुलांच्या गटात अनुदानित आश्रमशाळा अलंगुण या संघाने वैनतेय विद्यालय संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. वैनतेय विद्यालय संघाला द्वितीय क्र मांकावर समाधान मानावे लागले. मुलींमध्ये जिल्हा परिषद शाळा देवलदरी संघाने अनुदानित आश्रमशाळा अलंगुण संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. अनुदानित आश्रमशाळा अलंगुण संघाला द्वितीय क्र मांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत मुलांच्या १३, तर मुलींच्या नऊ संघांनी सहभाग घेतला होता.
विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण माजी नगरसेवक विक्रांत चांदवडकर व उपस्थितांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर राज्य खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, प्रशिक्षक उमेश आटवणे, क्रीडाशिक्षक राजेंद्र सोमवंशी, वैभव नाकील आदि उपस्थित होते.