अॅलेस्टर कुक कर्णधारपदी कायम
By admin | Published: July 24, 2014 01:17 AM2014-07-24T01:17:41+5:302014-07-24T01:17:41+5:30
भारतीय संघाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतरसुद्धा इंग्लंडच्या राष्ट्रीय निवड समितीने अॅलेस्टर कुकला कर्णधारपदी कायम ठेवले आहे.
Next
लंडन : भारतीय संघाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतरसुद्धा इंग्लंडच्या राष्ट्रीय निवड समितीने अॅलेस्टर कुकला कर्णधारपदी कायम ठेवले आहे. दुसरीकडे यष्टिरक्षक मॅट प्रायरच्या जागी जेस बटलरला संघात स्थान देण्यात आले आहे. प्रायरने लॉर्ड्स कसोटीनंतर जाहीर केले होते की, तो उर्वरित मालिकेत खेळणार नाही. या सामन्यात बटलर आपले पदार्पण करणार आहे. बटलरने इंग्लंडकडून 33 वनडे,
36 टी-2क् आंतरराष्ट्रीय सामने
खेळले आहे. इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज कॅरिगनला संघाबाहेर ठेवले आहे. तिसरी कसोटी साउथम्पटन येथे रविवारपासून सुरू होणार
असून, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-क्ने आघाडी घेतली आहे.
संघ पुढील प्रमाणो : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅँडरसन, गॅरी बॅलेंस, ईयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, क्रिस जार्डन, लिअन प्लंकेट, सॅम रॉबसन, जो रुट, बेन स्टोक्स, क्रिस स्टोक्स (वृत्तसंस्था)