अ‍ॅलिस्टर कूक कर्णधारपदावरून ‘आउट’

By admin | Published: December 20, 2014 10:29 PM2014-12-20T22:29:36+5:302014-12-20T22:29:36+5:30

सतत फ्लॉप ठरणाऱ्या अ‍ॅलिस्टर कूकला इंग्लंड संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) घेतला आहे़

Alastair Cook's 'out' | अ‍ॅलिस्टर कूक कर्णधारपदावरून ‘आउट’

अ‍ॅलिस्टर कूक कर्णधारपदावरून ‘आउट’

Next

लंडन : सतत फ्लॉप ठरणाऱ्या अ‍ॅलिस्टर कूकला इंग्लंड संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) घेतला आहे़ आता संघाची धुरा अनुभवी फलंदाज इयान मोर्गन याच्याकडे सोपविण्यात आली आहे़ विशेष म्हणजे कुकला वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात जागा मिळाली नाही़
मोर्गन आता आॅस्ट्रेलियात होणाऱ्या तिरंगी मालिकेत संघाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहे़ या मालिकेत सहभाग घेणारा भारत हा तिसरा देश असणार आहे़ दरम्यान, पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठीही मोर्गनच संघाचा कर्णधार राहील़
कूक सध्या आपल्या फॉर्मशी झगडत आहे़ गत २२ वन-डे सामन्यांत त्याला केवळ एक अर्धशतकी खेळी करता आली आहे़ विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला २-५ ने मात खावी लागली होती़
‘ईसीबी’ने वृत्तसंस्थेला सांगितले की, इयान मोर्गनकडे अ‍ॅलिस्टर कूकऐवजी इंग्लंड वन-डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ इंग्लंडच्या निवड समितीची शुक्रवारी बैठक झाली़ या बैठकीत आॅस्ट्रेलिया दौरा आणि वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे़

वर्ल्डकप संघातून बाहेर झाल्याचे दु:ख आहे़ या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मला बरेच दिवस लागतील़ असे असले तरी इंग्लंड संघाला आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी शुभेच्छा.
- अ‍ॅलिस्टर कूक, माजी कर्णधार, इंग्लंड

वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व करणे अभिमानास्पद बाब आहे़ वर्ल्डकपसाठी हा सर्वोत्कृष्ट संघ आहे़ नक्कीच आम्ही या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित करू, असा विश्वास आहे़
- इयान मोर्गन, नवनियुक्त कर्णधार,

Web Title: Alastair Cook's 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.