अल्काराझ दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन; 'ग्रँडस्लॅमचा चौकार', दिग्गज नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:41 AM2024-07-15T11:41:06+5:302024-07-15T11:44:11+5:30

सर्वियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अल्काराझने दिमाखात विम्बल्डन जेतेपद उंचावले.

Alcaraz is Wimbledon champion for the second time; 'The Grand Slam's foursome', the legendary Novak Djokovic's blast | अल्काराझ दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन; 'ग्रँडस्लॅमचा चौकार', दिग्गज नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा

अल्काराझ दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन; 'ग्रँडस्लॅमचा चौकार', दिग्गज नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा

विम्बल्डन : वयाच्या २१व्या वर्षीच स्पेनच्या कार्लोसअल्का राझने दुसरे विम्बल्डन जेतेपद पटकावताना एकूण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. सर्वियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अल्काराझने दिमाखात विम्बल्डन जेतेपद उंचावले.

केवळ २ तास २७ मिनिटांमध्ये बाजी मारताना अल्काराझने जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) असे नमवले. जूनमध्ये उजव्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जोकोविचच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, तरीही त्याने झुंजार खेळ करताना विक्रमी ३७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली, रविवारी अंतिम सामन्यातही जोकोविच उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधून खेळला. त्याच्या मर्यादित हालचालींचा अचूक अंदाज घेत अल्काराड़ाने नेटजवळ अप्रतिम ड्रॉप फटके मारत गुणांची वसुली केली. तसेच, काही वेगवान फोर हँड्सनेही त्याने जोकोला बेजार केले. जोकोला अनेकदा अल्कारााच्या वेगवान फटक्यांना परतावता आले नाही आणि यामुळे तो हतबलही झाला. 

पहिले दोन सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर जोकोने तिसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतरही जोकोविचने सुरुवातीच्या चार गुणांपर्यंत चांगली झुंज दिली. मात्र, यानंतर अल्काराझने मिळविलेली पकड न सोडता कार्लोस अल्काराझ जोकोविचला चुका करण्यास भाग पाडले.

राजकुमारी केट मिडलटन हिला अभिवादन

कर्करोगावर उपचार घेत असलेली ब्रिटनच्या वेल्सची राजकुमारी केट मिडलटन रविवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत पाहण्यासाठी ऑल इंग्लंड क्लब येथे पोहोचली. तेव्हा चाहत्यांनी उभे राहून राजकुमारीला अभिवादन करत स्वागत केले. राजकुमारीच्या हस्ते अल्काराझ याला ग्रँडस्लॅम विजेतेपद देण्यात आले.

महत्त्वाचे

- वयाची २२ वर्ष पूर्ण होण्याआधीच दोनवेळा विम्बल्डन जिंकणारा अल्काराझ हा बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतरचा तिसरा टेनिसपटू ठरला.
■ जोकोविचने २०१४ व २०१५ सालानंतर विम्बल्डनमध्ये रॉजर
फेडररविरुद्ध अंतिम सामना खेळल्यानंतर पहिल्यांदाच एकाच खेळाडूविरुद्ध सलग दोन विम्बल्डन अंतिम सामने खेळले. ■ यंदाच्या मोसमात आतापर्यंत जोकोविचने पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेची अतिम फेरी गाठली होती.
■ दिग्गज रॉजर फेडररच्या विश्वविक्रमी आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी करण्यात जोकोविच पुन्हा अपयशी ठरला.

Web Title: Alcaraz is Wimbledon champion for the second time; 'The Grand Slam's foursome', the legendary Novak Djokovic's blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.