अल्फाजा आयानाचा जागतिक विक्रम

By admin | Published: August 12, 2016 11:21 PM2016-08-12T23:21:18+5:302016-08-12T23:21:49+5:30

दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २९ मिनिट १७.४५ सेकंदाची वेळ नोंदवून २३ वर्षाचा विक्रम मोडीत काढून सुवर्णपदक जिंकले

Alfa ya's world record | अल्फाजा आयानाचा जागतिक विक्रम

अल्फाजा आयानाचा जागतिक विक्रम

Next

शिवाजी गोरे ।

(थेट रियो येथून) 
इथोपियाच्या २४ वर्षीय अल्फाजा आयानाने महिलांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २९ मिनिट १७.४५ सेकंदाची वेळ नोंदवून २३ वर्षाचा विक्रम मोडीत काढून सुवर्णपदक जिंकले. पूर्वीचा जागतिक विक्रम चीनच्या व्यांग ज्युसियाने ८ सप्टेंबर १९९३ रोजी बीजिंगमध्ये प्रस्तापित केला होता.

या क्रीडा प्रकारचा आॅलिम्पिक विक्रम इथोपियाच्या तिरुनेश दिबाबाने १५ आॅगस्ट २००८ रोजी बीजिंग येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत नोंदविला होता. आज मात्र तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
माराकाना येथिल आॅलिम्पिक स्टेडियमच्या ट्रॅकवर शुक्रवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटाने थंडी वातावरण असताना ही शर्यत सुरु झाली. सुरुवातीला केनियाची नोव्हावुना अ‍ॅलेक्स अ‍ॅपरोट, चिरूईयोत विवेन, अल्फाज आयान व तिरूनेश दिबाबा या आघाडीवर होत्या या चौघी सहा हजार मीटर पर्यंत एकत्र धावत होत्या. जगातील दिग्गज धावपटू शर्यतीत कोण आघाडी घेतय यांचा अंदाज घेतल होत्या.

एवढे अंतर पार होई पर्यंत १७ मिनिट ३६.७४ सेकंद झाले होते. नंतर ६.५०० मीटरचे अंतर संपल्यानंतर अल्फायाने शर्यतील आघाडी घेतली (रेस लीड करणे). पण तरी सुध्दा चिरूयोत, तिरूनेश व नोव्हावूना तीची पाठ सोडायला तयार नव्हत्या. शेवटचे नऊ हजार मीटरचे अंतर संपल्यानंतर अल्फाजने थोडा वेग वाढविला तेव्हा वेळ पूर्ण झाली होती २६ मिनिट २२.८८ सेकंदाची. जेव्हा तांत्रिक पंचांनी शेवटच्या फेरीची घंटा वाजविली तेव्हा आल्फाजने आपला वेग जास्त वाढविला. नऊ हजार मीटरचे अंतर पार केल्यावर तीने शेवटीची ४०० मीटरची फेरी तीने १ मि. ०८.०७ सेकंदात पूर्ण करून २९मिनिट १७.४५ सेकंदाची वेळ नोंदवून नवीन विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या चिरूयोतला दुसऱ्या (रौप्य, २९मि. ३२.५३ सें.) तर बीजिंग आॅलिम्पिकमध्ये नवीन विक्रमाची (आॅलिम्पिक विक्रम) नोंद केलेल्या तिरूनेश दिबाबाला तिसऱ्या क्रमांकावर (कास्य, २९ मि.४२.५६सें.) समाधान मानवे लागले.

Web Title: Alfa ya's world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.