आॅलिम्पिक रद्द झाल्यास सर्व प्रयत्न वाया जातील - चानू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:03 AM2020-03-23T02:03:42+5:302020-03-23T02:04:21+5:30
गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.
नवी दिल्ली : ‘कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिक जर वेळेत झाले नाही , तर पदक मिळवण्यासाठीचे सर्व प्रयत्न वाया जातील,’ असे मत भारताची स्टार भारोत्तोलक मीराबाई चानू हिने म्हटले आहे. गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.
आॅलिम्पिक आता रद्दही होऊ शकते. मीराबाईने सांगितले की,‘जर आॅलिम्पिक झाले नाही. तर आमची मागची चार वर्षांची मेहनत वाया जाईल. मला वाटते की स्पर्धा रद्द होऊ नये. मी देवाकडे रोज तशी प्रार्थना करत आहे. मी फक्त माझ्यासाठी एक आॅलिम्पिक पदक मागते.’ या आधी मीराबाईला रियो आॅलिम्पिकमध्ये क्लिन अॅण्ड जर्कमध्ये तिन्ही प्रयत्नात वजन उचलता आले नव्हते. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित झाल्या आहेत.
टोकियो स्पर्धाही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव नष्ट होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने खेळाडूंना सराव सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरदेखील टीका होत आहे. मीराबाईने या आधीच आॅलिम्पिक कोटा मिळवलाआहे.
ती म्हणाली की, ‘पदक जिंकण्यासाठीचा दबाव आता बदलला आहे. मी सरावाच्या वेळेचा विचार करत नाही. जर ही स्पर्धा स्थगित झाली तर खूप समस्या निर्माण होतील.’ भारोत्तोलनची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धाही कोरोना विषाणूमुळे रद्द झाली. (वृत्तसंस्था)