अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ
By रवी दामोदर | Published: December 15, 2023 12:27 PM2023-12-15T12:27:21+5:302023-12-15T12:27:33+5:30
देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ सहभागी
रवी दामोदर, अकोला
अकोला : अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हनुमान क्रीडा संकुल येथे गुरुवार, दि.१४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटन सामना खेळविण्यात आला. या स्पर्धेत देशातील पुरुषांचे २० व महिलांचे १० संघ सहभागी झाले आहेत.
हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ, स्व. रामकृष्ण अप्पा मिटकरी चषकाचे आयाेजन केळीवेळी येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक एकनाथ दुधे, तर पुरुष गटाच्या सामन्याचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड, तर महिला गटाच्या सामन्याचे उद्घाटन गोदावरी मिटकरी यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून हभप सोपान शेलार, डॉ. श्रीकांत काळे, कविता मिटकरी, राष्ट्रीय कबड्डीपटू प्रवीणा गोणे, दहीहंडा ठाणेदार वाघमारे, नाजूकराव पखाले, प्रा. विवेक हिवरे, वासुदेव नेरकर, डॉ. अशोक मोंढे, रामभाऊ अहिर आदी उपस्थित होते. उद्घाटन सामना पुरुष गटात हनुमान क्रीडा मंडळ, केळीवेळी विरुद्ध समता क्रीडा मंडळ, नाशिक आणि महिला गटात अकोला जिल्हा संघ, अकोला विरुद्ध एसएस अकॅडमी, दिल्ली यांच्यात झाला. या कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येत आहेत.
या स्पर्धेकरिता आलेले पंच
स्पर्धा निरीक्षक वासुदेव नेरकर, आंतरराष्ट्रीय पंच पद्माकर देशमुख, पंच अधिकारी ऋषिकेश कोकाटे, राहुल यादव, प्रशांत रोडे, रवी रोहनकार, चरण शिरसाट, विजय सोनकर, हरीश हरणे, राम नवघरे, दिनेश चंदेल, बिपिन हटकर, वसंत उडाले, देवी कांबळी, महेंद्र डेंगे, रवी नारनवरे, नरेंद्र उमरेकर, शैलेश देशमुख, सय्यद मकसूद, विकास नवघरे, संजय खातोकार, रवी राठोड, सुरेश कालसर्पे, सुधाकर कोहालकर, गौरव धानोरकर, वानखडे, शुभम लुंगे, शोभा सहारे, हे काम पाहणार आहेत.