कसोटीतील अष्टपैलूंच्या क्रमवारीत आर. अश्विन अव्वल
By admin | Published: March 13, 2017 06:18 PM2017-03-13T18:18:32+5:302017-03-13T18:23:30+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटीतील अष्टपैलूंच्या नवीन क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने अव्वल स्थान पटकाविले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 13- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटीतील अष्टपैलूंच्या नवीन क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने अव्वल स्थान पटकाविले आहे. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे त्याची क्रमवारीत घरसण झाली आणि बांगलादेशच्या शकीब अल हसनला अव्वल स्थान मिळाले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शकीबचीही कामगिरी खराब झाली. त्यामुळे या कसोटीनंतर त्याच्याही क्रमांकात घसरण झाली. यामुळे आर. अश्विन पुन्हा अव्वल ठरला. अष्टपैलूंच्या क्रमवारीत आर. अश्विनला 434 गुण आहेत, तर शकीबला 403 गुण आहेत.
कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा कप्तान विराट कोहली मागे पडला आहे. विराट कोहली दुस-या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. तर, न्युझीलंडचा कप्तान केन विल्यम्सन दुस-या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केन विल्यम्सने 130 धावांची खेळी केल्यामुळे त्यांचे गुण वाढले आणि त्याने इंग्लंडचा ज्यो रुट आणि विराट कोहलीला मागे टाकले. याचबरोबर, कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत सुद्धा आर. अश्विन अव्वल स्थानावर आहे. तर रवींद्र जडेजा दुस-या स्थानावर आहे.