ऑलिम्पिक दर्जासाठी रिओने पार केले सर्व स्पीडब्रेकर्स

By admin | Published: August 16, 2016 07:50 PM2016-08-16T19:50:19+5:302016-08-16T19:50:19+5:30

आॅलिम्पिक स्पर्धा भरविणे सोपे काम नाही. यासाठी शहराचा पूर्णपणे मेकओव्हर करावा लागतो.

All Speedbreakers crossed the Rho to the Olympic level | ऑलिम्पिक दर्जासाठी रिओने पार केले सर्व स्पीडब्रेकर्स

ऑलिम्पिक दर्जासाठी रिओने पार केले सर्व स्पीडब्रेकर्स

Next

(थेट रियो येथून)
शिवाजी गोरे, 
आॅलिम्पिक स्पर्धा भरविणे सोपे काम नाही. यासाठी शहराचा पूर्णपणे मेकओव्हर करावा लागतो. आर्थिक अडचणीत असूनही रिओ दि जानेरिओ महापालिकेने ते पेलले आहे. यासाठी सर्वात प्रथम रस्त्यावरील सर्व स्पीडब्रेकर्स पहिल्यांदा हटविले. रिओमध्ये सगळे रस्ते चकचकीत करण्यात आले आहेत. त्यासाठी ड्रेनेज लाईनही बदलल्या असून एकही चेंबर रस्त्यावर येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
आॅलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने शहरात रियो दि जानेरियो शहरामध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. त्यामध्ये रस्ते, पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या. विशेष म्हणजे काही रस्त्यांवर मोठमोठ्या पाईपना नटबोल्टने जोडून तात्पुरते पूल करण्यात आले आहेत.
सार्वजनिक वाहतुकीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी बीआटीसाठी वेगळा नवीन मार्ग केला गेलेला आहे. त्याचबरोबर तयार करतानाच रस्त्यामध्ये कोठेही पाण्याची ड्रेनेज लाईन येणार नाही याची दखल घेण्यात आली आहे. जेथे रस्ता संपले तेथे मात्र त्यांनी त्या ड्रेनेजची लाईन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेली आहे. रस्त्याच्या मध्ये भागी आपल्याला कोठेच ड्रेनेजचे चेंबर दिसत नाही. सगळी चेंबर ही फुटपाथवर आहेत.
या संदर्भात बाहा विभागातील जाक्कवारे पागा (आपल्याकडे जशा पेठा असतात तसे) मधील एका सोसायटीचे अधिकारी मार्कस यांना विचारले असता ते म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने रिओमध्ये खूप काही सुधारणा झाल्या आहेत. आर्थिक अडचणीत रियो आहे हे खरे आहे; पण त्यावर सुद्धा येथील शासनाने मात केली आहे. रियो शहरात तेथे नव्याने सुधारणा झाल्या आहेत येथील अभियांत्रिकाचे म्हणणे आहे की, जर ड्रेनेज लाईन रस्त्याच्या मध्यभागीेतली तर रस्ते व्यवस्थित राहत नाहीत. पाण्याची अडचण आली तर रस्त्याचे खोदकाम करावे लागते. मग रस्ता चांगला व स्वच्छ राहत नाही. नवीन सुधारणा केलेल्या भागात तुम्ही रियोमध्ये कोठेही जा तुम्हाला पाण्याचे ड्रेनेज रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवरच दिसेल. त्यामुळे रस्त्याचे खोदकाम करण्याची वेळ येतच नाही.
बीआटी बस स्टेशनपासून स्टेडियमवर जाण्यासाठी सिमेंट काँक्रिटचा पूल न बांधता मजबूत पाईपच्या सहाय्याने नटबोल्ट लावून तात्पुरते पूल तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा संपल्यानंतर तो पूल काढून टाकण्यात येतील. सिमेंटने बांधलेले पूल नंतर पांढरा हत्ती होतात म्हणून अशा प्रकारे कमी खर्चात स्पर्धा आयोजन होत आहे.
सध्या या स्पर्धेच्या निमित्ताने रियोत येणारे परदेशी चलन, विविध देशांमधून आलेले पाहुणे येथील सर्व सोसायटींमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे घरमालकांचा फायदा होतोय. स्टेडियमजवळ जास्त मोठी हॉटेल्स नसल्यामुळे हे सर्व लोक पेइंग गेस्ट म्हणू राहत आहेत. स्पर्धेपूर्वी आलेली आर्थिक मंदी या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच संपेल असे रियोवासियांना वाटत आहे.

Web Title: All Speedbreakers crossed the Rho to the Olympic level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.