दीड कोटी बक्षिसांचे बॅडमिंटनपटूंना वाटप
By Admin | Published: May 6, 2017 12:45 AM2017-05-06T00:45:36+5:302017-05-06T00:45:36+5:30
सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या दिग्गज खेळाडूंना
नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या दिग्गज खेळाडूंना भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) १ कोटी ६० लाख रुपयांचे रोख पुरस्कार देऊन सन्मानित केले.
संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. हिमांता बिस्वा शर्मा यांनी २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियन सुपर सिरिज विजेती पहिली भारतीय सायना नेहवाल हिला २५ लाख रुपये दिले. सिंधूला २०१६ च्या मलेश्यिा मास्टर्स आणि २०१५ च्या मकाऊ ओपनचे जेतेपद, २०१४ मधील राष्ट्रकुलच्या जेतेपदाबद्दल २० लाख रुपये मिळाले. प्रोत्साहन रक्कम अद्याप मिळाली नसल्याची माहिती पारुपल्ली कश्यप याने शर्मा यांना दिली होती.
ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता आणि सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्सचा विजेता पी. ं याला ३० लाख देऊन सन्मानित करण्यात आले. आरएमव्ही गुरुसाईदत्त याला ग्लास्गो राष्ट्रकुलचे कांस्य मिळाले होते. त्याला पाच लाख रुपये तसेच महिला दुहेरीचे रौप्यपदक जिंकणारी जोडी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांना दहा लाखाचा पुरस्कार मिळाला. (वृत्तसंस्था)