Paris Paralympics 2024 Day 2 : गोल्डन गर्ल अवनीसह या भारतीय खेळाडूंवर असतील नजरा, इथं पाहा वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:26 AM2024-08-30T10:26:23+5:302024-08-30T10:27:57+5:30
इथं एक नजर टाकुयात भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पॅरा बॅडमिंटनच्या कोर्टमधून भारताची सुरुवात होईल. टोकिया पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीसह दोन पदकं जिंकणारी पॅरा नेमबाज अवनी लेखेरा देखील दुसऱ्या दिवशी अॅक्शनमध्ये दिसणार आहे. ती दुसऱ्या दिवशीच भारताला पदक मिळवून देईल अशी आशा आहे. नेमबाजीशिवाय अॅथलेटिक्स आणि सायकलिंगमध्ये देखील मेडल इवेंट मॅच आहे. इथं एक नजर टाकुयात भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर
Let's get ready for Day 2️⃣ of #ParisParalympics2024🇫🇷 as our #Para stars are all set to keep up the winning momentum.
— SAI Media (@Media_SAI) August 29, 2024
Keep chanting #Cheer4Bharat out loud as India🇮🇳 awaits an eventful day at the #Paralympics2024.
Catch all the LIVE action at DD Sports & Jio Cinema! pic.twitter.com/BRxtS1hdvj
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी १२:०० नंतर- महिला एकेरी SL 3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (मानसी जोशी)
पॅरा शूटिंग/ नेमबाजी
- दुपारी १२:३० नंतर- R2 महिला १० मीटर एअर रायफल SH1 परात्रता फेरी (अवनी लखेरा आणि मोना अग्रवाल)
A talk session with Mona Agarwal
— SAI Media (@Media_SAI) August 30, 2024
The star #ParaShooter🔫 will compete in the Women's 10 m Air Rifle SH1 category at #Paralympics2024🇫🇷. She talks about why she chose rifle instead of pistol in an @Media_SAI exclusive.
Tune in 🔊
Click this link 🔗 to watch the full interview:… pic.twitter.com/XTvhB5HHd1
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी १२:४० नंतर- पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (सुहास यथिराज)
- दुपारी ०१:२० नंतर- पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (मनोज सरकार)
पॅरा टेबल टेनिस
- दुपारी ०१:३० नंतर- महिला दुहेरी WD 10 पात्रता फेरी (भावनाबेन पटेल आणि सोनालबेन पटेल)
पॅरा अॅथलेटिक्स
- दुपारी ०१:३० - महिला थाळीफेक F55 अंतिम सामना (मेडल इवेंट) (साक्षी कसाना/ कर्म ज्योती)
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०२:०० नंतर- पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (नितेश कुमार)
पॅरा शूटिंग/नेमबाजी
- दुपारी ०२:४५ - P1 पुरुष १० मीटर एअर पिस्तूल SH1 पात्रता फेरी रुद्रांश खंडेलवाल/ मनिष नरवाल)
पॅरा रोइंग
- दुपारी ०३:०० - पॅरा मिश्र दुहेरी स्कल्स (PR3 MIX2X) (अनिता आणि के. नारायणा)
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- दुपारी ०३:०३- महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड १६ (सरिता)
पॅरा शूटिंग/ नेमबाजी
- दुपारी ०३:१५ - R2 महिला १० मीटर एअर रायफल SH1 (अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल) (जर पात्र ठरल्या तर)*
पॅरा सायकलिंग ट्रॅक
- दुपारी ०४:२४ - पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत पात्रता फेरी (अर्शद शेख)
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०४:४० नंतर- महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज सी दुसरी लढत (पलक कोहली)
पॅरा अॅथलेटिक्स
- दुपारी ०४:४५ - महिला १०० मीटर T35 अतिंम फेरी (मेडल इवेंट) (प्रीती पाल)
पॅरा शूटिंग/नेमबाजी
- सायंकाळी ०५:०० - R4 मिश्र दुहेरी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH 2 पात्रता फेरी (श्रीहर्ष देवराद्दी )
- सायंकाळी ०५:३० - P1 पुरुष १० मीटर एअर पिस्तूल SH1 अंतिम फेरी (मेडल इवेंट) रुद्रांश खंडेलवाल/ मनिष नरवाल) (जर पात्र ठरले तर)*
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- सायंकाळी ०७:०० - पुरुष वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड १६ (राकेश कुमार/ श्याम सुंदर)
पॅरा सायकलिंग ट्रॅक
- सायंकाळी ०७:११ - पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत कांस्य पदकासाठी (अर्शद शेख) (जर पात्र ठरला तर)*
- सायंकाळी ०७:१९ - पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत सुवर्ण पदकासाठी (अर्शद शेख) (जर पात्र ठरला तर)*
पॅरा बॅडमिंटन
- सायंकाळी ०७:३० - महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (श्रीहर्ष देवराद्दी)
पॅरा शूटिंग/नेमबाजी
रात्री ०७:४५ - R4 मिश्र 10 मीटर रायफल स्टँडिंग SH2 अंतिम फेरी (मेडल इवेंट) (श्रीहर्ष देवराद्दी) (जर पात्र ठरली तर)